जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन…
ऐतिहासिक देखाव्यानि वेधले लक्ष...

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन…
*ऐतिहासिक देखाव्यानि वेधले लक्ष…*
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा व सांस्कृतिक मोत्सवाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते पार पडले शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या असून त्या तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त ठरतात असे मत मुख्याधिकारी खरात यांनी व्यक्त केले.

*यावेळी ऐतिहासिक देखाव्यांनी वेधले लक्ष…*
या महोत्सवात ऐतिहासिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या विविध देखावे सादर करण्यात आले. सर्वधर्मसमभाव संत परंपरा भगतसिंग सुखदेव राजगुरू भारत माता यांचे जिवंत देखावे सादर करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या वेशभूषांनी भारावून गेलो होतो.

कबड्डी,क्रिकेट,खो खो,हॉलीबॉल, टेबल टेनिस,धावणे भालाफेक,गोळा फेक, यासारख्या 50 हून अधिक खेळांचा यामध्ये समावेश असून जवळपास 2 हजार कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे तसेच दररोज संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार..



