मराठी पत्रकार परिषदेच्या संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेची कार्यशाळेचे आयोजन…
कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन...

मराठी पत्रकार परिषदेच्या संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेची कार्यशाळेचे आयोजन…
बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा दिनांक 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रात 4 वाजता डिजिटल मीडिया परिषदेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून प्रसन्न जोशी प्रसिद्ध न्यूज चॅनलचे अँकर असणार आहे तर डिजिटल मीडिया कार्यशाळेच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून श्री प्रथमेश जोशी व्हिडिओ (प्रोडक्शन अँड डिजिटल कन्टेन्ट) असणार आहेत तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जी वाघमारे (डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली व बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष रंजीतसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत दुपारच्या सत्रात वेळ 4 वाजता डिजिटल मीडिया संदर्भात कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले आहे.
डिजिटल युगात वावरत असताना आपण कुठेही कमी पडू नये व नवनवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला सहजरित्या करता यावा व त्यासंबंधीची माहिती देण्यासाठी या डिजिटल मीडिया परिषदेच्या कार्यशाळेला जिल्हाभरातील सोशल मीडिया, डिजिटल मीडिया युट्युब चॅनेल, संपादक, प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदे चे विभागीय सचिव जितेंद्र कायस्थ जिल्हाध्यक्ष मयुर निकम, सचिव दीपक मोरे, इफ्तेखार खान, योगेश शर्मा यांच्या वतीने करण्यात येत आहे.



