क्राईम बातमी

देऊळगाव राजा तिला दुकानातून चोरी केलेल्या 30 एअर रायफल्सह पिस्तूल जप्त..

देऊळगाव राजा तिला दुकानातून चोरी केलेल्या 30 एअर रायफल्सह पिस्तूल जप्त..

 

देऊळगाव राजा शहरातील एअर रायफल व पिस्तूल विक्रीच्या दुकानातून गेल्या महिन्यात चोरी गेलेल्या 8 एअर रायफल व 22 पिस्तूल जप्त करण्यात देऊळगावराजा पोलिसांना यश आले आहे याप्रकरणी पोलिसांनी देऊळगाव राजा शहरातीलच दोघांना ताब्यात घेतले आहे

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे करीत होते दरम्यान देऊळगाव राजा बायपास वर काही मुलं बंधू घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली त्या अनुषंगाने त्यांनी व गुन्हे अन्वेषण पथकाने बायपास वरून दोघांना ताब्यात घेतले त्यांची विचारपूस केली असता एअर रायफल व पिस्तूल त्यांचीच धन्नावत यांच्या दुकानातून चोरल्याचे स्पष्ट झाले प्रकरणी 28 नोव्हेंबर रोजीच पोलिसांनी विचारपूस करून त्यांच्याकडून चोरी गेलेल्या उर्वरित बंदुकाही ताब्यात घेतल्या पंचा समक्ष ही कारवाई करण्यात आली एक लाख 27 हजार रुपये किमतीच्या या एअर पिस्तूल व एअर रायफल आहेत
याप्रकरणी रोशन सिंग बबलू सिंग टाक वय वर्ष 20 राहणार संजय नगर देऊळगाव राजा आणि हिरासिंग मोहनसिंग बावरे वय 19 राहणार विवेकानंद कॉलनी या या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिनांक 16 ऑक्टोबर रोजी आठ एअर रायफल व 22 पिस्तूल चोरी गेल्या होत्या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसात तक्रार देण्यात आली होती तेव्हापासून पोलीस चोरट्यांच्या मागावर होते जवळपास एक लाख 27 हजार रुपयांच्या त्या रायफल होत्या
उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कुमार मालवीय पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे दत्ता नरवाडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन गीते भगवान नागरे विश्वनाथ काकड माधव कुटे गणेश जायभाय सय्यद मुसा अनिल देशमुख यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button