बातमी

तपासणीपासून उपचारापर्यंत… सेवाभावाची वाटचाल! मनोज दांडगे यांच्या पुढाकारातून ३५ गरजू रुग्ण पुढील उपचारासाठी रवाना

तपासणीपासून उपचारापर्यंत… सेवाभावाची वाटचाल!

मनोज दांडगे यांच्या पुढाकारातून ३५ गरजू रुग्ण पुढील उपचारासाठी रवाना

मासरूळ : स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मासरूळ, जामठी, जनूना, वरूड व कुंबेफळ येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांमध्ये तब्बल १ हजार ८०७ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

तपासणीनंतर शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आलेल्या ३५ गरजू रुग्णांना दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी वरूड येथून पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी जळगाव खान्देश येथे रवाना करण्यात आले. संतोष भाऊ दांडगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांच्या हस्ते हिरवी दिंडी दाखवून वाहनाला रवाना करण्यात आले.

केवळ आरोग्य तपासणी करून थांबायचे नाही, तर तपासणीत आढळलेल्या गरजू रुग्णांना पुढील उपचार मिळवून देण्यापर्यंत त्यांच्यासोबत राहायचे, या सेवाभावी भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे या उपक्रमातून ‘तपासणीपासून उपचारापर्यंत’ सेवाभावाची वाटचाल अधोरेखित झाली आहे.

ग्रामीण व गरजू नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा आणि आवश्यक उपचार मिळावेत, यासाठी करण्यात येत असलेला हा उपक्रम समाजसेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.

गरजूंच्या आरोग्यासाठी एक पाऊल…
समाजसेवेची हीच खरी दिशा!

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button