बातमी

कचरा आंदोलना नंतर घंटागाडी सुरु होताच फटाके व नारळ फोडून, हार व सोबतच्या कर्मच्यांऱ्याना रुमाल टोपी घालून केले स्वागत

घंटागाडी सुरु झाली, फटाके फुटले,आता नळाला पाणी कधी सुटणार ? हा प्रश्न अंजनी वासियांसमोर कायमच...

  • कचरा आंदोलना नंतर घंटागाडी सुरु होताच फटाके व नारळ फोडून, हार व सोबतच्या कर्मच्यांऱ्याना रुमाल टोपी घालून केले स्वागत

घंटागाडी सुरु झाली, फटाके फुटले,आता नळाला पाणी कधी सुटणार ? हा प्रश्न अंजनी वासियांसमोर कायमच…

मेहकर तालुक्यातील अंजनी बु.ही ग्रामपंचायत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरते.असाच वेगळा विषय बनला आहे. गावातील कचरा व्यवस्थापन आणि पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरुन ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेली तीव्र नाराजी व संतापाला अखेर ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला.कचरा संकलनासाठी ट्रॅक्टर सुरु करण्यात आल्यानंतर विषेश आश्चर्यकारक ठरल्याने ग्रामस्थांनी त्यांचे चक्क फटाके, नारळ फोडून, ट्रॅक्टरला हार-तुरे घालून व सोबतच्या कर्मचाऱ्यांना रुमाल टोपी देऊन स्वागत केले. हे सर्व करण्यामागे कृतज्ञता आहे का अजुन काय हेही अद्याप पर्यंत कुणाच्याही ध्यानी मनी आले नाही.

कचरा संकलनासाठी ग्रामपंचायत मध्ये घंटागाडी उपलब्ध असूनही तिचा नियमित वापर होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे गावातील विविध दर्शनीय भागांत ऐन गणपती व महालक्ष्मी या मुख्य सणात कचरा प्रचंड मोठ्या प्रमाणात साचत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. त्याचबरोबर काही भागांत दीड महिन्यापर्यंत नळाला पाणी सुद्धा मिळत नसल्याची तक्रार अनेक ग्रामस्थांनी केली आहे.
या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या मालकीची असलेल्या घंटागाडीचा विचार न करता तिसऱ्या दिवशी भाड्याने ट्रॅक्टर लावुन कचरा संकलन सुरु करण्यात आले.
विशेष म्हणजे,कचरा संकलनाचे ट्रॅक्टर सुरु झाल्याचा ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने आनंद व्यक्त केला,तो चर्चेचा विषय ठरला आहे.फटाके फोडून,नारळ फोडून,व कर्मचाऱ्यांना रुमाल टोपी,आणि हार-तुरे घालून गाडीचे स्वागत करण्यात आले.एखाद्या नवीन वाहनाचे किंवा घरात अनेक वर्षांनी आनंदाची घटना घडल्याचे जसे स्वागत केले जाते, तसा उत्साह ग्रामस्थांमध्ये दिसून आला.
या स्वागतामागे केवळ आनंद नसून सार्वजनिक मूलभूत सुविधा मिळण्यासाठी नेहमीच आंदोलन करावे लागते का? हा प्रश्नही यामागे दडलेला आहे.
कचरा संकलनाचे ट्रक्टर सुरु करण्यासाठी ग्रामस्थांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आणि त्यानंतर कार्यवाही झाली,तर ग्रामपंचायत व ग्रामस्थांमधील संवाद आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाच्या व अकार्यक्षम कार्यपद्धती बाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
हे अंजनी बु.ग्रामस्थांच्या आंदोलनाला उशिरा का होईना ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला.परंतु आता कचरा संकलनाची ही व्यवस्था नियमित किती दिवस सुरु राहते.त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कचऱ्याचे ट्रक्टर तर सुरु झाले आता नळाला पाणी कधी येणार ? दीड महिन्यांपासून पाणीपुरवठ्याची तक्रार असलेल्या भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन कोणती ठोस उपाययोजना करते, याची ग्रामस्थ प्रतिक्षा करत आहेत.
ग्रामस्थांच्या स्वागताने दिलेला संदेश.
कचरा गोळा करणाऱ्या ट्रॅक्टरचे एवढ्या उत्साहात स्वागत होणे ही एकीकडे प्रशासनाच्या कार्यवाहीबद्दलची कृतज्ञता आणि दिलासा दर्शवते; तर दुसरीकडे, मूलभूत सुविधा वेळेवर मिळणे ही सामान्य बाब असावी, त्यासाठी संघर्षाची वेळ येऊ नये, असा अप्रत्यक्ष संदेशही यातून दिसतो. तसेच पाणीपुरवठ्याचा प्रश्न किती लवकर सुटतो, हेच या संपूर्ण प्रकरणाचे पुढचे महत्त्वाचे टप्पे ठरणार आहेत.
ग्रामस्थांच्या या अनोख्या स्वागतानंतर आता ग्रामपंचायत प्रशासन पुढची मूलभूत सुविधा कधी उपलब्ध करुन देणार ? याकडे अंजनी बु. ग्रामस्थांसह संपूर्ण मेहकर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे…..

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button