बुलडाण्यात 22 आक्टोंबरला लोकनेते केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री डॅा. रामदासजी आठवले यांचा “ समता मार्च “ चे आगमन व जाहीर सभा चे आयोजन

बुलडाण्यात 22 आक्टोंबरला लोकनेते केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री डॅा. रामदासजी आठवले यांचा “ समता मार्च “ चे आगमन व जाहीर सभा यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार
मलकापुर,(प्रतिनिधी बाबासाहेब जाधव)- डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारीत चालवत असलेला एकमेव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीयध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री लोकनेते दिनदुबळ्याचे ह्रदय सम्राट डॉ.रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली व अध्यक्षतेखाली “ समता क्रांती मार्च “ चे आयोजन करण्यात आले आहे. हा समता मार्च महाड येथील चवदार तळ्यापासून सूरू होणार आहे कारण पाण्यासाठी महामानव बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनदलीतांन साठी पहीला पाण्यासाठी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सर्वांना हे तळे खुले करून दिले होते. त्या क्रांतिकारी महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाले तसेच डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू स्री शिक्षणाचे उदार कर्ते स्वातंत्र्य समता बुध्दुत्वाचा विचार जगापुढे मांडणारे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीला 200 वर्ष पूर्ण झाले आहे हा सुवर्ण योग साधून लोकनेते केंद्रीय मंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीयध्यक्ष डॅा. रामदासजी आठवले यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेऊन “ समता क्रांती मार्च “ काढून समता,बंधुत, शांती करूणेचा संदेश प्रत्येक मानसा पर्यंत पोहोचवून समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी सर्व जाती धर्म एक राहून या पृथ्वी तलावावर सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र नांदावे बंधू भावाप्रमाणे आनंदाने नांदावे हा संदेश देण्यासाठी हा समाता क्रांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. हा समता क्रांती मार्च बुलडाणा जिल्हा 22 मार्च 2026 गुरुवार रोजी आगमन होणार आहे. सर्व प्रथम मॅा जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा येथील त्यांच्या मॅा जिजाऊच्या व बाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेऊन बुलढाणा येथे 22 आक्टोंबर 2026 रोजी जाहीर सभा केंद्रीय मंत्री डॅा. रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे या सभेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय,महाराष्ट्राचे हे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत राष्ट्रीय महासचिव माजी मंत्री अविनाशजी माहातेकर, राष्ट्रीय सचिव दयालजी बाहदुरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री राजाभाऊ सरोदे, महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष बाबूरावजी कदम, महाराष्ट्र प्रदेश महासचिव पॅंथर गौतम सोनवणे, महाराष्ट्र संघटक सचिव सुधाकर तायडे, विदर्भ अध्यक्ष मोहनजी भोयर तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे व समाता क्रांती मार्च चा संदेश 22 आक्टोंबरच्या बुलढाणा येथील जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहे. या समाता क्रांती मार्च ची तयारी करण्यासाठी बुलढाणा रिपाइं आठवले जिल्हाध्यक्ष उत्तर भाऊसाहेब सरदार गाव, खेडे, वाड्या वस्त्या रात्रंदिवस जाऊन , उन वारा जीवाची तब्बीयतीची पर्वा नकरता एकच ध्येय 22 आक्टोंबरची बुलडाणा येथील जाहीर सभा न भुतो न भविष्यती कसा होईल यांचा डोळ्या समोर विचार करून फिरत आहे. गाव तीथे रिपाईची शाखा घर तेथे कार्यकर्रता तयार करून छोट्या छोट्या सभा घेऊन 22 आक्टोंबरच्या जाहीर सभेची तयारी करीत आहेत. इतर पक्षातील कार्यकर्त्यानचे प्रवेश घेऊन लोकनेते रामदासजी आठवले साहेबांचे विचार इतर पक्षातील कार्यकर्त्यांना पटवून देऊन त्यांना रिपाइं आठवले गटात आणत आहेत.असे हजारो कार्यकर्ते इतर पक्षातील पदाधिकारी यांचे प्रवेश करून घेतले आहे व ही 22 आक्टोंबरची बुलडाणा येथील सभा नभुतो नभविषती होणार आहे. तसेच नागपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यातून परत येतांना मुंबई कडे 27 आक्टोंबर 2026 रोजी मलकापूर येथे या समता मार्चे आगमन होणार आहे त्या आगमनाच्या स्वागताची ही जोरात तयारी चालू आहे तरी या बुलडाण्याच्या 22 आक्टोंबर 2026 च्या जाहीर सभेला व 27 आक्टोंबर2026 च्या समता मार्चे च्या मलकापूर येथील आगमनाच्या स्वागत साठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेंचे जिल्हाध्यक्ष पॅंथर भाऊसाहेब सरदार यांनी संपूर्ण फुले शाहू आंबेडकर विचार धारेच्या जनतेला व डॅा. बाबासाहेब आंबेडकर व डॅा. रामदासजी आठवलेंवर प्रेम करणाऱ्यांनी तसेच बुलडाणा जिल्ह्यातील रिपाईच्या ग्रामीण, शहरी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, महीला पदाधिकारी, शहरी, ग्रामीण महीला आघाडी , जिल्हा, शहर, ग्रामीण युवक आघाडी यांनी या 22 आक्टोंबर 2026 च्या बुलढाणा येथील जाहीर सभेचा प्रचार प्रसार करावा व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित करावे असे विनंती वजा तळमळीचे आवाहन जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार यांनी केले.



