मौजे गाडेगाव खुर्द येथील शेतकऱ्यांचे शेतीचा मोबदला मिळावा याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू

मौजे गाडेगाव खुर्द येथील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू
मौजे गाडेगाव खुर्द येथील शेतकऱ्यांचे शेतीचा मोबदला मिळावा याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू उपोषण करते
कराळे यांच्या मालकीची शेत सर्वे क्रमांक 157 मधील सन 1997 वर्षी गाडेगाव खुर्द ते सातळी पर्यंतचा रस्ता बनवत असताना उपोषणकर्त्याची कुठलीही परवानगी न घेता तेथे रस्ता बनवण्यात आला असल्याचा आरोप करत अमोल श्रीकृष्ण कऱ्हाळे गणेश श्रीकृष्ण कऱ्हाळे राहणार गाडेगाव खुर्द यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे शेत सर्वे गट नंबर 157 मधील 23 गुंठ्याचे 1997 पासून ते 2023 पर्यंत पिकाचे नुकसान झाले त्याचा 26 वर्षाचा नुकसानीचा मोबदला देण्यात यावा तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग बुलढाणा यांनी 23 गुंठे रस्त्यासाठी सरळ खरेदीचा सर्व प्रस्ताव तयार केलेला आहे तरी आठ दिवसाच्या आत तयार केलेल्या प्रस्तावानुसार 23 गुंठ्याची खरेदी करून मोबदला देण्यात यावा याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे



