बांधकाम व इमारत बांधकाम मंडळात नवीन लावण्यात आलेले नियम रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

बांधकाम व इमारत बांधकाम मंडळात नवीन लावण्यात आलेले नियम रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
मध्यान भोजन, आरोग्य तपासणी, सुरक्षा संच या योजना बंद करून पेन्शन लागू करा
मान्य न झाल्यास 8 जानेवारी रोजी आंदोलनाचा दिला इशारा
बुलढाणा:( आदर्श नेतृत्व) आज दिनांक 28 डिसेंबर
महामंडळामध्ये जे नवीन बदल करण्यात आले ते कामगाराला लाभापासून वंचित ठेवणारे असून बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातून सर्वात मोठा जिल्हा आहे याचे क्षेत्रफळ 200 किलोमीटरच्या वर आहे एवढ्या दुरून कामगाराला यावे लागते आपले कागदपत्र पडताळणीसाठी 100 ते 150 किलोमीटर वरून येऊन त्यानंतर कधी लाईट नसते तर कधीही नेटवर्क नसते एखादा वेळेस पडताळणीसाठी आलेले कागद विसरून जातो त्यानंतर कागदपत्र पडताळणी नंतर काही कारणास्तव नामंजुर करण्यात येते कामगारांना सांगण्यात येते की परत अर्ज भरून टाका अगोदर अर्ज भरून दोन तीन महिने लागतात एक अर्ज निकाली लागायला जवळपास एक वर्षाचा कालावधी लागत आहे त्यामुळे खरा कामगार योजनेपासून वंचित राहत आहे .
पूर्वी कामगारांना संदेश देऊन सात दिवसांमध्ये त्रुटीची पूर्तता करण्यास वेळ दिला जात होता तो वेळ परत देण्यात यावा अण्णा काम सोडून आपली मजुरी बुडवून तसेच येण्या जाण्याचे भाडे खर्च करून मानसिक त्रास सर्व बाबींचा विचार करून मंडळांनी कामगारांचे कोणतेही नुकसान न होता त्याला लाभ कसा मिळेल याची दखल घ्यायला हवी सुरक्षा संच व अत्यावश्यक संच व आरोग्य तपासणी मध्यान भोजन हे बंद बंद करून कामगारांना पेन्शन लागू करण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे मागण्या मान्य न झाल्यास आठ जानेवारी रोजी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला निवेदनावर मधुकर जोगदंड संस्थापक अध्यक्ष बुलढाणा जिल्हा मजदूर संघटना जफर खान अकबर खान निलेश देवरे सतीश पडवळ मुकेश रेड्डी गौतम मोरे प्रल्हाद चव्हाण विनोद काळोद सय्यद परवेज सुनील खिल्लारी सुधाकर अंभोरे चांद शहा प्रल्हाद मोरे गणेश जाधव विजय सातपुते दगडू पवार अन्वर खान रामेश्वर जाधव उदय सुरळकर विशाल खंडारे शेख रहीम रहीम यांच्यासह असंख्य कामगारांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत



