बातमी

वडिलांच्या जयंतीनिमित्त संतोष डवले यांचा मासरूळ येथे समाजकार्याचा वसा; विविध उपक्रमांनी जपला स्मृतींचा वारसा

वडिलांच्या जयंतीनिमित्त संतोष डवले यांचा मासरूळ येथे समाजकार्याचा वसा; विविध उपक्रमांनी जपला स्मृतींचा वारसा

“बाप” हा मुलाचा पहिला आदर्श असतो आणि याच आदर्शाची जपणूक मासरूळ येथील अभ्यासू व्यक्तिमत्व संतोष डवले यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. आपले वडील स्व. वसंतराव डवले यांच्या जयंतीचे निमित्त साधून संतोष डवले व त्यांच्या मित्र मंडळाने गावात राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांनी ‘बाप-लेकाच्या’ नात्यातील माणुसकीचा एक वेगळाच ओलावा निर्माण केला आहे. केवळ घोषणा किंवा पुष्पहार अर्पण करण्याच्या औपचारिकतेला फाटा देऊन, संतोष डवले यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ गावातील स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचा विडा उचलला.
​या श्रमदान मोहिमेत गणेश दादा नरवाडे, संजय भाऊ गायकवाड, देविदासजी साळवे, किरण भाऊ काटोले, आश्विन सीनकर सर, विजय भाऊ गायकवाड, प्रवीण भाऊ गाढवे, विष्णू भाऊ गुळवे, गजानन भाऊ काटोले, कोथळकर सर, अक्षय सिनकर सर, दिलीप भाऊ पाखरे, दिनेश भाऊ दांडगे, बाबुराव भाऊ सिनकर, विनोद भाऊ काटोले, राहुल भाऊ गुळवे, कृष्णा भाऊ सपकाळ, अक्षय भाऊ साळवे, राहुल शिवणकर सर आणि रुद्र कोथळकर यांनी हिरिरीने सहभाग घेऊन स्मशानभूमीचा परिसर चकाचक केला व समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.
​स्मशानभूमी स्वच्छतेसोबतच, सायंकाळी भक्तीचा वारसा जपत श्री गजानन महाराज संस्थानास स्व. वसंतराव डवले यांच्या नावे उपयुक्त भेटवस्तू किंवा देणगी देण्यात येणार आहे. तसेच शिक्षणाची ओढ असलेल्या व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करून त्यांच्या प्रगतीला मदतीचा हात दिला जाणार आहे. वडिलांनी दिलेली संस्कारांची शिदोरी अशा समाजोपयोगी कार्यातून खर्च करून संतोष डवले यांनी पितृप्रेमाची एक अनोखी भेट समाजासमोर मांडली आहे. हा उपक्रम येथेच न थांबवता, येणाऱ्या दोन दिवसांमध्ये अजून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचे नियोजन त्यांनी केले असून, या विधायक कार्यामुळे संपूर्ण मासरूळ परिसरात डवले मित्र मंडळाचे विशेष कौतुक होत आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button