बातमी

पोलीस शिपाई भरती दरम्यान गैरप्रकार निदर्शनास आल्यास थेट संपर्क करा

पोलीस शिपाई भरती दरम्यान गैरप्रकार निदर्शनास आल्यास थेट संपर्क करा

* जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांचे पत्रकार परिषदेत आवाहन
बुलडाणा :
    जिल्हा पोलीस दलासाठी पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (बॅण्डस्मन) पदाची रिक्त पदे भरण्याकरीता 19 जूनपासून भरती प्रक्रिया सकाळी 6 वाजे पासून पोलीस मुख्यालयाचे मैदावर सुरु होत आहे. या भरती प्रक्रियेवर पोलीस विभागाचे सुक्ष्म लक्ष राहणार आहे. भरती प्रक्रिया कालावधीत कालावधीत जिल्हा पोलीस दलातील गोपनिय यंत्रणा कार्यान्वित राहणार असून उमेदवारांनी कोणाचेही अमिषास बळी पडू नये. कोणताही गैरप्रकार होत असल्याचे निर्दशनास आल्यास थेट संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी केले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या सभागृहात 17 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी उपस्थित होते.
      पोलीस शिपाई पदाकरीता शारिरीक मोजमाप चाचणी मैदानी चाचणी १९ जून ते 1 जुलै या कालावधीत होणार असुन पोलीस शिपाई (बॅण्डस्मन) पदाकरीता शारिरीक मोजमाप चाचणी 2 जुलै ते 3 जुलै या कालावधीत होणार आहे. शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी सुरवातीचे दोन दिवसामध्ये ५०० व उर्वरित दिवसांमध्ये ८०० प्रमाणे उमेदवार दररोज उपस्थित राहणार आहेत. उमेदवारांनी पोलीस मुख्यालयाचे मैदावर मुळ आवेदन अर्ज, मुळ प्रवेश पत्र, आवेदन अर्ज भरतानांचे पासपोर्ट फोटो, स्वतःची ओळख पटविण्यासाठी (अ) मुळ आधार कार्ड (ब) मतदान ओळखपत्र (क) वाहन परवाना / पॅनकार्ड सोबत आणावे, सध्या पावसाळा असल्याने उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचेवेळी अचानक पाऊस आल्यास जिल्हा पोलीस दलाकडुन पर्यायी मैदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत उमेदवारांना योग्य त्या सूचना वेळोवेळी देण्यात येईल. तसेच उमेदवारांनी देखील त्यांचे शैक्षणिक कागदपत्रे सुस्थितीत राहणेकरीता आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहनही पोलीस अधिक्षक कडासने यांनी केले.
* अपिलीय अधिकाऱ्यांकडून आक्षेपांचे निरसन :
    भरतीच्या स्थळी उमेदवारांकडून त्यांच्या उंची छातीचे मोजमापाबाबत तक्रार किंवा आक्षेप व इतर अडीअडचणीचे अनुषंगाने भरती सक्षम प्राधिकारी, अपीलीय अधिकारी यांचेकडून वेळीच निरसन करण्यात येईल. तसेच दैनिक मैदानी चाचणीचे निकालपत्र दररोज मुख्यालयाचे सूचना फलकावर व जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
* पारदर्शक प्रक्रियेसाठी उपाययोजना :
      भरती प्रक्रिया तटस्थ, निःपक्षपाती व पारदर्शक व्हावी, यासाठी मैदानावर व मैदानाच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पद भरतीच्या प्रत्येक टप्यावर उमेदवारांची व्हीडीओ शुटींग, सीसीटिव्हीचे चित्रीकरण होणार आहे. उमेदवारांनी कोणतेही उपकरण सोबत ठेवू नये व कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर बाब भरती प्रक्रिये दरम्यान निदर्शनास आल्यास संबंधीत उमेदवाराला भरती प्रक्रियेमधुन बाद करुन त्याचे विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
…तर उमेदवाराला बाद केले जाईल :
      उमेदवारांनी ‘ऑन लाईन’ अर्जामध्ये जी माहिती नमूद केली आहे त्याच आधारे जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे उमेदवारांचे प्राथमिक कागदपत्राची तपासणी करणार येणार असून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र फेरतपासणी करण्यात येणार आहे. फेर तपासणीमध्ये शैक्षणिक कागदपत्रे, इतर प्रमाणपत्रे खोटी, मुदतबाहय अथवा चुकीची आढळून आल्यास उमेदवाराला भरतीच्या कोणत्याही टप्यावर बाद करण्यात येईल.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button