कृषी विशेष

शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी संपेपर्यंत नाफेड मार्फत खरेदी कायम सुरू ठेवा..

जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा दिला इशारा

शेतकऱ्यांच्या घरातील शेवटचा दाणा संपेपर्यंत नाफेड मार्फत खरेदी कायम सुरू ठेवा..

 

बुलढाणा (आदर्श नेतृत्व)
नाफेड मार्फत सुरू असलेल्या शासकीय खरेदी केंद्रांना कायमस्वरूपी सुरू ठेवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे
काही दिवसांपूर्वी नाफेड अंतर्गत सुरू करण्यात आलेली शासकीय खरेदी केंद्र बारदाना अभावी बंद पडले होती आता या शासकीय खरेदी केंद्राची मुदत वाढ देखील आज 31 जानेवारी रोजी संपत आहे .
जिल्ह्यात जवळपास 5 हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणी बाकी असून आज नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीची मुदत देखील संपत आहे.
ज्यांच्या नोंदी झाल्या ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइनही नोंद झाली अशा बऱ्याच शेतकऱ्यांची सोयाबीन अजून घरात पडून आहे. मुदत संपल्यानंतर ही सोयाबीन  खरेदी केंद्रावर  नाफेड मार्फत विकत घेतली जाईल का असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकला आहे.आणि आज शेवटची तारीख असल्याने नाफेड केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन नाफेड खरेदी केंद्रावर आणले आहे.
या संदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की शासनाची नाफेड मार्फत सुरू असलेल्या खरेदीचा आज शेवटचा दिवस असून याची मुदतवाढ देण्यात यावी व शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीनच्या शेवटचा दाना खरेदी करेपर्यंत कायम सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी  तालुकाप्रमुख लखन गाडेकर विजय इंगळे
किसान सेना उप जिल्हा प्रमुख अशोक गव्हाणे, माजी सभापती सुधाकर आघाव, युवासेना तालुका प्रमुख संजय शिंदे, अपंग सेलचे गणेश सोनुने, दलीत आघाडीचे तालुका प्र बबन खरे, आशिष बाबा खरात, उप तालुका प्रमुख संजय गवळी, सुनील गवते, विजय इतवारे, बाजार समितीचे संचालक हरी सिनकर, किशोर कानडजे, मोहम्मद सोफियान, अनिकेत गवळी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, निर्मलकुमार इंगळे, राहुल जाधव, अनिल राणा, डिंगबर दळवी, विरेंद्र बोर्डे, रवी गोरे, मुकुंदा काळे यांचेसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button