बातमी

हक सैलानी या सैलानी च्या जयघोषात दुमदुमली मलकापूर पांग्रा नगरी हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

हक सैलानी या सैलानी च्या जयघोषात दुमदुमली मलकापूर पांग्रा नगरी हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

मलकापूर पांग्रात सैलानी सरकारच्या आगमनाचा उत्सव
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सरकार सैलानी यांच्या आगमनाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला या उत्सवानिमित्त सरकार सैलानी च्या ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो हिंदू मुस्लिम बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला १४ फेब्रुवारी रोजी मोहम्मद हनीफ शाह सरकार सैलानी यांचे आगमन झाले होते त्यांनी समाधी घेण्याच्या अगोदर मोहम्मद हनीफ शाह सरकार सैलानी हे मलकापूर पांग्रा येथे आले होते त्यांच्या येण्याचे औचित्य साधून मलकापूर पांग्रा येथे भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते 14 फेब्रुवारी रोजी मलकापूर पांग्रा येऊन भक्तांना त्यांनी भेट दिली होती त्यानंतर ३१ मार्च २०१५ रोजी गुरुमाऊली सरकार सैलानी यांनी वाशिम जिल्ह्यातील अनसिंग या गावांमध्ये समाधी घेतली होती सरकार सैलानी यांचे मलकापूर पांग्रा येथे हिंदू मुस्लिम समाजाचे हजारो शिष्य असून त्यांच्या १४ फेब्रुवारी रोजी सैलानी सरकार यांचे खानकावर चादर चढून व कुराण पठण करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली या महाप्रसादाचा गावातील व परिसरातील शेकडो हिंदू मुस्लिम भाविक भक्तांनी लाभ घेतला त्यानंतर पाच वाजता मोहम्मद हनीफ शाह सरकार सैलानी यांच्या प्रतिमेचा रथ तयार करून व उंटावर चादर चढून ढोल ताशाच्या गजरात हक सैलानी या सैलानी च्या जय घोषात करून गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे सांगता सरकार सैलानीच्या खानकाहवर भव्य चादर चढून कुराण पठण फातेहा खणी करण्यात आली होती महाप्रसाद व कार्यक्रमाच्या यशस्वी साठी मलकापूर पांग्रा येथील सर्व हिंदू-मुस्लिम भाविक भक्तांनी व गावातील सरकार सैलानी ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते यामध्ये गावातील १४ दर्गेवर सुद्धा चादर चढविण्यात आली होती.

आमदार मनोज कायंदे यांनी सरकार सैलानीचा दर्शन घेतले
आज 14 फेब्रुवारी रोजी मलकापूर पांग्रा येथे सरकार सैलानीच्या आगमना निमित्त भव्य महाप्रसादाचा लाभ ठेवण्यात आला होता त्यानिमित्त सिंदखेडराजा मतदारसंघाचे लाडके आमदार मनोज कायंदे यांनी हजेरी लावून सरकार सैलानीच्या चादर चे दर्शन घेतले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button