उद्या बुलढाण्यात १६२ जागांसाठी पोलीस भरती!
उमेदवारांनी प्रलोबनाला बळी न पडण्याचे आवाहन - जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे आवाहन

उद्या बुलढाण्यात १६२ जागांसाठी पोलीस भरती!
– उमेदवारांनी प्रलोबनाला बळी न पडण्याचे आवाहन
– जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन
बुलढाणा: जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पदांसाठी उद्या 11 फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदान येथे भरती प्रक्रिया होणार आहे. शिपाई पदासाठी १४८ तर १४ चालक पदांसाठी ही भरती होत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे पूर्ण तयारी करण्यात आली असून, एकूण १४२५३ उमेदवार उपस्थित असणार आहेत. पर जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पुरुषांची राहण्याची व्यवस्था ग्रामीण पोलीस ठाणे नजीक असलेल्या पोलीस दलाच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे, तर महिलांकरिता दीपक जोग पेट्रोलियम बाजूला असलेल्या इमारतीत व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ५.०० वाजतापासून उमेदवारांची मैदानीला सुरुवात होईल. दोन दिवसामध्ये ८०० उमेदवार व उर्वरित दिवसांमध्ये दररोज १४०० उमेदवार उपस्थित राहणार आहेत. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अधिकारी, कर्मचारी असे एकूण ५२० पोलीस कर्तव्यावर असतील. उमेदवारांनी कुठल्याही प्रलोबनाला बळी पडू नये, अत्यंत पारदर्शक पणे ही भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी दिली.



