भिमटेकटी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बुध्दिस्ट फेस्टिवल 17 मे 2026 ला भिमजयंती,बुध्दजयंतीच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला व बुध्दभिमगितांचा भहारदार कार्यक्रम

भिमटेकटी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे बुध्दिस्ट फेस्टिवल 17 मे 2026 ला भिमजयंती,बुध्दजयंतीच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानमाला व बुध्दभिमगितांचा भहारदार कार्यक्रम
औरंगाबाद,(प्रतिनिधी)- डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पु.प्रा.भिक्खुणी धम्मदर्शना महाथेरो यांनी स्थापन केलेल्या भारतीय विनय अलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र जडवाडा भिमटेकडी यांनी आयोजित केलेल्या बुध्दिस्ट फेस्टिवल 2026 भिमजयंती व बुध्दजयंती संयुक्त विद्यमाने 17 मे 2026 रोज रविवारला संयकाळी पाच (5.00) ते रात्री दहा (10.00) पर्यंत व्याख्यानमाला व बुध्दभिमगीतांचा कार्यक्रम विश्वशांती बुध्दविहार जटवाडा रोड, सुभाषनगर, लेणीपरिसर, भिमटेकडी, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पु.भदन्त खेमोधम्मोजी महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला असून या कार्यक्रमाचे उद्दघाटक आयएएस अधिकारी मुंबई उत्तमरावजी खोब्रागडे तर विशेष अतिथी जेष्ठ लेखक व साहित्यिक ऋषिकेशजी कांबळे राहणार आहे व विशेष उपस्थिती श्रद्धा हाऊस्पिटल औरंगाबादचे डॅा.मानवजी पगारे, जेष्ठ समाजसेवीका अनिताताई हिवाळे, एलआयसी अधिकारी एस.आर.बोधडे, ज्येष्ठ पत्रकार बुलडाणा बाबासाहेब जाधव राहणार आहेत.
सर्व आंबेडकर जनतेला व प्रबुध्द जनतेला अत्यंत आनंद होत आहे की, भारतीय विनय अलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र या संस्थेच्या वतीने भिमजयंती ते बुध्दजयंती श्रामनेर, श्रामणेरी बेसिक प्रशिक्षण शिबीर प.पु.प्रा.महाथेरो धम्मदर्शना यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण घेण्याचा उद्देश म्हणजे प.पु.भारतरत्न विश्वरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की,” मी बौद्ध झालो, माझा मुलगा बौध्द होऊ शकत नाही. त्यासाठी त्याला धम्माची 10 दिवसाची श्रामणेर दीक्षा घ्यावी लागेल.” त्या अनुषंगाने भिमटेकडी येथे एक महीण्याचे 17 एप्रिल ते 17 मे शिबीर आयोजित केले होते. त्या श्रामणेर, श्रामणेरी बेसिक प्रशिक्षण शिबिराची सांगता व भिमजयंती कशा पद्धतीने साजरी करावयाची व बुध्द जयंती कशा पद्धतीने साजरी करायची याचा समाजावर होणारा परिणाम याबाबत 17 मे याच दिवशी व्याख्यान व भिमबुध्द गीताचाही कार्यक्रम आयोजीत केला आहे. तरी सर्व उपासक/उपासिका व बुध्द भिम प्रेमी यांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून धम्मज्ञानाचा लाभ घ्यावा व धम्माचे काम करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते त्यासाठी तनमन धनाने माताजींच्या फोन पे 9822633484,8208134850 किंवा बॅंकॲाफ महाराष्ट्र, औरंगाबाद एसी 60233326522 आयएफएससी एमएचबी0000152 यावर धम्मदान देऊन पुण्याचं कुशल कम्म संपादन करावे ही मंगल कामना करून धम्मदान करावे. असे आवाहन भिक्खुणी प्रा.धम्मदर्शना महाथेरो भिमटेकडी जटवाडा (औरंगाबाद) छत्रपती संभाजीनगर यांनी भिम उपासक-उपासिका धम्मदात्यांना केले. तसेच येणाऱ्या सर्व उपासक-उपासीकांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे.



