बातमी

रिपाइं आठवले बुलडाणा युवाजिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील (म्हस्के) यांना 2026 चा सैनिक रत्न पुरस्कार जाहीर

रिपाइं आठवले बुलडाणा युवाजिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील (म्हस्के) यांना 2026 चा सैनिक रत्न पुरस्कार जाहीर

 

बुलढाणा,(प्रतिनिधी)- मातृतीर्थ बुलडाण्या जिल्ह्याचे भूमिपुत्र तडफदार सर्वधर्म समभावाचे फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेचे युवा नेते बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे युवाजिल्हाध्यक्ष प्रकाश मनोहरराव पाटील (म्हस्के) हिवराश्रम तालुका मेहकर यांची सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य मुबंई या संस्थेने यावर्षीचा मानाचा मानला जाणारा“ सैनिक रत्न पुरस्कार 2026 “ चा जाहीर केला आहे.
26 जूलै 2026 रोजी शहीद स्मारक बीएमसी ॲाफीस समोर मुंबई येथे सकाळी 10.00 वाजता मोठ्या थाटात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
प्रकाश पाटील म्हस्के 80 टक्के समाजकारण व विस टक्के राजकारण करणारे उच्च विभूषित बीएससी बायलॅाजी, केमिस्ट्री तसेच एमएससी ॲारगनिक केमिस्ट्री असलेले भारतीय मानवाधिकार समिती महाराष्ट्र सचिव मुंबई, रयत क्रांती राजकीय संघटना या पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यरत होते. जनजागृतीच्या माध्यमातून समाजसेवा, शैक्षणिक, स्वच्छता अभियान,व्यसनमुक्ती,शेतकरी चळवळ तसेच सर्वधर्म समभाव यासारख्या सामाजिक उपक्रमांव्दारे समाजामध्ये एकतेचा, बंधुत्वाचा व समाजिक जबाबदारीचा संदेश देत असलेल्या त्यांच्या समाजिक धार्मिक कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनने 2026 वर्षीचा मानाचा सर्वोच्च पुरस्कार या संस्थेने बुलडाणा जिल्ह्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार तथा राष्ट्रीयध्यक्ष डॅा.रामदासजी आठवले यांचे एकनिष्ठ बुलडाणा जिल्हायुवाध्यक्ष प्रकाश मनोहरराव पाटील म्हस्के यांना जाहीर झाल्यामुळे बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, समाजभूषण भिमरत्न पुरस्कार प्राप्त जेष्ठनेते इंजि. प्रा.भैयासाहेब पाटील, महीलाध्यक्षा वंदनाताई वाघ, रोहीणीताई कबीरदास, जिल्हा अल्पसंख्याक आघाडी प्रमुख नबाब मिर्झा बेग, विदर्भनेते पॅंथर मुरलीधर गवई, दलितमित्र विजय सपकाळ, कार्यध्यक्ष प्रा.मुक्तार पठाण, महासचिव निळकंठ सोनोने, विजय साबळे, विदर्भउपाध्यक्ष संजय वाकोडे, भाऊसाहेब वानखडे, रामेश्वर वाकोडे,विदर्भमहीलाउपाध्यक्षा आशाताई वानखेडे, इंजि. राजेश सरकटे, इंजि. भास्करराव जाधव, सर्वश्रीतालुकाध्यक्ष बुलडाणा केशवराव सरकटे, उषाताई इंगळे, चिखली हीम्मतराव जाधव, युवानेते विशाल गवई,मोताळा बाळासाहेब आहीरे, लोणार पॅंथर समाधानजी सरदार, सिंदखेड राजा भानुदास शेजूळ, रमेश पिंपळे, पत्रकार विजय भालमोडे, युवानेते महेंद्र साळवे, देऊळगाव राजा प्रदिप मुखदयाल,आकाशभैया साळवे, संतोषदादा हिवाळे, मेहकर युवापॅंथर पंकज वाघ, राणा मोरे, फौजी राहूल आवसरमोल,नांदुरा पत्रकार शैलेश वाकोडे, मलकापूर पेंटर दिलीप इंगळे, संग्रामपूर बाबूलाल इंगळे, जळगाव जामोद संतोषराव वानखेडे, शेगाव विलास सावंत इत्यादी असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रकाश पाटील यांचे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंद केले.पूढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्याच्या सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सच्या व प्रमाणित समाजिक,धार्मिक, राजकीय कामांची दखल महाराष्ट्र राज्य मुंबई सैनिक फेडरेशनने दखल घेतल्याबद्दल संस्थेचे ही रिपाइं बुलढाणा यांनी अभिनंदन केले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button