बातमी

महात्मा ज्योतीराव फुलेंना “महात्मा” पदवी दिली ते ठिकाण शासनाने हेरीटेज स्मारक करावे व महात्मा पदवीचा उत्सव साजरा करावा- रिपाइं संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव

11 मे 1988 रोजी महात्मा ज्योतीराव फुलेंना “महात्मा” पदवी दिली ते ठिकाण शासनाने हेरीटेज स्मारक करावे व महात्मा पदवीचा उत्सव साजरा करावा- रिपाइं संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव

बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाव्दारे आवाहन करण्यात आले आहे की, मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्मसंस्था मांडवी कोळीवाडा (स्थापना १८३०) या संस्थेच्या सभागृहात ११ मे १८८८ रोजी मुंबईतील कष्टकरी कामगाराच्या वतीने ज्योतीराव फुले यांना “महात्मा” ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याला ११ मे २०२६ रोजी १३८ वर्ष पूर्ण झाले. या ऐतिहासिक घटनेचा उत्सव करावा व या क्रांतिकारी विचारांचे समाजसुधारक ज्योतीराव गोविंदराव फुले यांना ११ मे १८८८ रोजी मुंबईतील मांडवी कोळीवाड्यात (मसजीद बंदर) आयोजित सभेत जनतेने ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली होती.स्त्रीशिक्षण, जातिव्यवस्थेचा विरोध आणि शोषितांसाठी केलेल्या कार्यमुळे त्यांना हा सन्मान दिला होता.त्या घटनेला १३८ झाले आहे.
शासनाच्या वतीने या ऐतिहासिक घटनेची नोंद घेऊन मोठा उत्सव साजरा झाला पाहिजे आणि ज्योतीराव फुलेना “महात्मा” पदवी दिली ते ठिकाण महाराष्ट्र शासनाने ऐतिहासिक घटनेची नोंद घेऊन मोठा उत्सव महाराष्ट्र भर साजरा झाला पाहिजे व हे ठिकाण *हेरीटेज स्मारक* केले पाहिजे अशी यांनी मागणी बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या वतीने बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे महाराष्ट्र शासनाला विनंती केली आहे. त्याला बुलढाणा जिल्ह्यातील रिपाईचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, समाजभूषण भिमरत्न पुरस्कार प्राप्त जेष्ठनेते इंजि.प्रा. भैयासाहेब पाटील, जिल्हा महीलाध्यक्षा वंदनाताई वाघ, रोशनीताई कबीरदास, जिल्हा युवाध्यक्ष प्रकाश पाटील म्हस्के, जिल्हा अल्पसंख्याक आघाडी प्रमुख मिर्झा बेग, सैय्यद, विदर्भनेते संजयजी वाकोडे,रामेश्वर वाकोडे, जिल्हा संघटक संपर्क प्रमुख इंजि. शरद खरात, महासचिव निळकंठ दादा सोनोने, विदर्भनेते मुरलीधर गवई, भाऊसाहेब वानखडे, दलीतमित्र विजयराज सपकाळ, कार्यध्यक्ष प्रा.मुक्तार पठाण, विदर्भ नेत्या आशाताई वानखडे, सर्वश्री तालुकाध्यक्ष बुलडाणा केशव सरकटे, इंजि.भास्करराव जाधव, इंजि.राजेश सरकटे,उषाताई इंगळे,चिखली हीम्मतराव जाधव, विशाल गवई, दिपक कस्तूरे, मोताळा बाळासाहेब आहीरे, मलकापूर दिलीप इंगळे, देऊळगाव राजा प्रदिप मुखदयाल,आकाशभैया साळवे, सुधीरदादा हिवाळे, सिंदखेडराजा भानुदास शेजूळ, रमेश पिंपळे, सरपंच पत्रकार रामदास कहाळे, पत्रकार विजय भालमोडे, मेहकर पंकजदादा वाघ, राहूल आवसरमोल, राणा मोरे,लोणार समाधान सरदार, संग्रामपूर बाबूलाल इंगळे, जळगाव जामोद संतोषराव वानखेडे, नांदुरा पत्रकार शैलेश वाकोडे, शेगाव विलास गव्हांदे इत्यादी मान्यवरांनी पाठिंबा दिला.
ज्या महात्मा फुलेंनी या जगापुढे रयतेचे राजेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवना वरिल शुरविर काळाचा पहीला इतिहास मांडला व या महाराष्ट्रला व जगाला छत्रपती शिवाजी राजे कोण होते हे दाखवून दिले. त्यासाठी छत्रपतींच्या मावळ्यांनी तसेच महात्मा फुलेंचा वैचारिक वारसा सांगणाऱ्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी,संस्था,संघटनांनी व फुले शाहू आंबेडकरी विचार धारेच्या वैचारीक विचारवंतांनी शासन दरबारी पत्र व्यवहार करा असे बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव व संपूर्ण बुलडाणा जिल्हा रिपाई आठवले गटाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे महाराष्ट्र शासना कडे आवाहान केले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button