राजकीय बातमी

जिल्हा बँकेचे राजकारण तापले! आमदार कायदेंनी दंड थोपटले..

माजी मंत्री शिंगणे आणि केंद्रीय मंत्री जाधव यांच्या पॅनल विरोधात अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल..

 

जिल्हा बँकेचे राजकारण तापले! आमदार कायदेंनी दंड थोपटले..

माजी मंत्री शिंगणे आणि केंद्रीय मंत्री जाधव यांच्या पॅनल विरोधात अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल..

आ. मनोज कायंदे यांची पत्रकार परिषदेतून घोषणा!

९ उमेदवारांची यादी केली जाहीर..

दि. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे यासाठी खामगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली पण ती बैठक निष्फळ ठरली आहे. माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे उमेदवार सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. २१ संचालक पदासाठी होत असलेल्या या निवडणुकीत १२ उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात ८ मतदार संघातून ९ संचालक पदासाठी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांचे स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल रिंगणात आहे. अशाप्रकारे, डॉ शिंगणे खासदार प्रतापराव जाधव यांच्या पॅनलच्या विरोधात आमदार कायंदे यांनी दंड थोपटले आहे. तब्बल 16 वर्षांनी होणारी ही निवडणूक आता रंजक वळणावर आली आहे. सुरूवातीला बिनविरोध वाटणाऱ्या निवडणुकीने वळण घेतले आहे. ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. संचालक पदांसाठी २३ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून, २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. उद्या १२ ऑगस्ट रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. आता कोणाचा अध्यक्ष होणार याकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button