बातमी

मेहकरात आर्थिक साक्षरतेचा जागर ; महिलांना स्वावलंबनाचा कानमंत्र! 

राजर्षी शाहू मल्टिस्टेट, धनिक अ‍ॅडव्हायझर्सचा पुढाकार

मेहकरात आर्थिक साक्षरतेचा जागर ; महिलांना स्वावलंबनाचा कानमंत्र! 

* राजर्षी शाहू मल्टिस्टेट, धनिक अ‍ॅडव्हायझर्सचा पुढाकार
मेहकर 
      राजर्षी शाहू मल्टीस्टेट आणि धनिक अ‍ॅडव्हायझर्स प्रा. लि.च्या संयुक्त विद्यमाने मेहकर येथे आर्थिक साक्षरतेचा जागर करण्यात आला. महिलांना स्वावलंबनाचा कानमंत्र देत बचतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
      महिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविण्याच्या उद्देशाने १८ ऑक्टोबर रोजी ‘जागर स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवसेना उबाठा पक्षाच्या राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके, संचालिका छायाताई शेळके, नगर पालिका शिक्षण सभापती डॉ. दीपिकाताई रहाटे, नगरसेविका रूपालीताई गारोळे, शाल्मलीताई रायमुलकर, प्रा. संध्याताई पाटेकर, उर्मिलाताई ओव्हर, मीनाताई पाटील, सुजाताताई काळे, पल्लवीताई वानखेडे, स्वातीताई पागोरे, शिवकन्याताई खेडेकर, ज्योतीताई देवकर, डॉ अश्विनीताई शेळके, ज्योतीताई कृपाल, अनिताताई येवले, प्रियंका म्हस्के, ऋतुजा देशमुख, सोनाली भोपळे, सपना मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       प्रास्ताविकातून मेहकर विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबतची भूमिका मांडली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक नियोजनाचे महत्त्व, नियमित बचतीची सवय आणि आर्थिक शिस्त याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनपेक्षित संकटांचा सामना करताना आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, तसेच स्वतःच्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बचतीचे योग्य नियोजन कसे करावे, याविषयी उपस्थित महिलांशी संवाद साधण्यात आला.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासोबतच त्यांच्यामध्ये आर्थिक निर्णयक्षमता विकसित करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. संचालन अर्चना बोरे यांनी केले.
* वर्षभर चालणार उपक्रम : 
       सध्या नवरात्र सुरू आहे. सर्वत्र अध्यात्मिक आणि मंगलमय वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि धनिकच्यावतीने ‘ स्त्रीशक्तीचा, आर्थिक साक्षरतेचा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महिलांच उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला मिळत आहे. येथून पुढे वर्षभर हा उपक्रम सुरू राहणार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्याचा निर्धार संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी केला आहे.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button