बातमी
दीक्षाभूमी नागपुरात ‘मिशन पँथर 1970’चा फर्स्ट लुक मोशन पोस्टर अनावरण सोहळा उत्साहात
अभीता फिल्मचे प्रोडक्शन निर्माते सुनील शेळके यांच्या हस्ते वेबपेज व मोशन पोस्टरचे उद्घाटन

दीक्षाभूमी नागपुरात ‘मिशन पँथर 1970’चा फर्स्ट लुक मोशन पोस्टर अनावरण सोहळा उत्साहात
* अभीता फिल्मचे प्रोडक्शन निर्माते सुनील शेळके यांच्या हस्ते वेबपेज व मोशन पोस्टरचे उद्घाटन
* लेखक-दिग्दर्शक शैलेंद्र कृष्णा बागडे यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित
नागपूर
धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर आगामी ‘मिशन पँथर 1970’ या चित्रपटाच्या फर्स्ट लुक मोशन पोस्टरचे अनावरण आणि अधिकृत वेबपेजचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. अभीता फिल्मचे प्रोडक्शन निर्माते सुनील शेळके यांच्या हस्ते या दोन्हींचे उद्घाटन 20 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. या सोहळ्यामुळे चित्रपटाच्या प्रवासाला महत्त्वपूर्ण सुरुवात झाली आहे.
या कार्यक्रमाला चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक शैलेंद्र कृष्णा बागडे यांच्यासह चित्रपटातील प्रमुख कलाकार आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
दलित पँथर चळवळीचा ऐतिहासिक संघर्ष, स्वाभिमान, विद्रोह आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार मोठ्या पडद्यावर मांडण्याच्या उद्देशाने ‘मिशन पँथर 1970’ हा चित्रपट साकारण्यात येत आहे. सामाजिक न्याय, समता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी उभ्या राहिलेल्या चळवळीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा चित्रपट महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चित्रपटाच्या फर्स्ट लुक मोशन पोस्टरच्या अनावरणामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, अधिकृत वेबपेजच्या उद्घाटनामुळे चित्रपटासंदर्भातील माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
ऐतिहासिक दीक्षाभूमीवर धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या या सोहळ्याने सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना कलात्मक अभिव्यक्ती देण्याच्या प्रयत्नाला नवी दिशा दिली. चित्रपटाच्या पुढील प्रवासाकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.



