बातमी

वेळप्रसंगी तुरुंगातून निवडणूक लढणार…. स्वाभिमानी नेते रविकांत तूपकर

वेळप्रसंगी तुरुंगातून निवडणूक लढणार…. स्वाभिमानी नेते रविकांत तूपकर

रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी लढणार…

बुलढाणा
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी केलेल्या आंदोलनाचे गुन्हे आमच्यावर दाखल वैयक्तिक स्वरूपाचा एकही गुन्हा माझ्यावर दाखल नाही असं असताना दुसरीकडे जिल्ह्यात व महाराष्ट्रात गुंडागर्दीचे, खंडणीचे बलात्काराचे गुन्हे दाखल असणारी लोक मोकाट फिरत असल्याचा आरोपही स्वाभिमानी नेते रविकांत तुकाराम केला आहे तर
चळवळीत काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पोलीस जर न्यायालयाकडे अर्ज करून आमचा जामीन रद्द करा व त्यांना तुरुंगात ठेवा अशी भूमिका घेत असतील तर ही बाब लोकशाहीला धरून नाही
जशी लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली तसे सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे निवडणुकीच्या काळात मला तुरुंगात ठेवण्याचा डाव काही नेत्यांचा आहे
तुम्ही एक वर्ष नाही तर दहा वर्ष तुरुंगात टाका परंतु मी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणार वेळप्रसंगी तुरुंगातून निवडणूक लढणार अशी भूमिका स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केली आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button