विशेष बातमी

झारखंड येथील आंतरराष्ट्रीय विधवा* *दिवस कार्यक्रमात प्रा. लहाने यांचा* *सहभाग…

*झारखंड येथील आंतरराष्ट्रीय विधवा* *दिवस कार्यक्रमात प्रा. लहाने यांचा*
*सहभाग…*

*बुलडाण्याची विधवा

*झारखंड येथील आंतरराष्ट्रीय विधवा* *दिवस कार्यक्रमात प्रा. लहाने यांचा*
*सहभाग…*

*बुलडाण्याची विधवा- पुनर्विवाह चळवळ पोचली देशपातळीवर!*

*आंतरराष्ट्रीय विधवा दिवस 23 जून रोजी जगभर साजरा करण्यात आला.त्या निमीत्ताने झारखंड राज्यातील रांची येथे ‘संकल्प’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून भूमिका मांडण्याची संधी प्रा. डी एस लहाने यांना मिळाली.बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेली विधवा पुनर्विवाह चळवळ,विधवा परिषदांचे कार्य त्यांनी प्रभावीपणे मांडले.त्यामुळे बुलडाण्यातील मानस फाउंडेशन चे कार्य आता देश पातळीवर पोचले आहे.*

*जागतिक विधवा दिवसाच्या निमीत्ताने 22 व 23 जून 2024 रोजी झारखंड राज्यात रांची येथे दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन ‘नारी संघटन झारखंड’ च्या वतीने करण्यात आले होते.दोन दिवसीय कार्यक्रमात देशातील प्रमुख सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सहभागी करण्यात आले होते.पहिल्या दिवशी उद्घाटन सत्र व दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर नामवंत वक्त्यांचे मार्गदर्शन असा कार्यक्रम पार पडला. 22 जून रोजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेथील प्रसिद्ध समाजसेविका लीलादेवी होत्या. तर दुसऱ्या दिवशी निर्मला देवी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान* *भुषविले. या कार्यक्रमांमध्ये महिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. देश पातळीवर विधवा महिलांना येणाऱ्या समस्या आणि* *त्यावरील उपाय यावर कार्यक्रमांमध्ये चर्चा करण्यात आली. सामाजिक सुधारणेचे उपायही सुचविण्यात आले.*
*विधवा महिलांसाठी सुधारणावादी कार्यक्रम देशपातळीवर सुरू* *आहे.जागतिक विधवा दिवस हा जागतिक स्तरावर साजरा केला जातो. विदेशासह भारतामध्ये अनेक ठिकाणी विधवा महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रा.लहाने यांच्या* *संकल्पनेतून मानस फाउंडेशन च्या वतीने विधवा महिलांसाठी विधवा परिषदांच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केले जात आहे.अनेकांचे संसार उभे केले जात आहे. याची दखल राज्याच्या बाहेरही घेतल्या जात असून झारखंड येथे त्यांना सन्मानपूर्वक बोलविण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये त्यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विधवा विवाहाच्या चळवळी विषयी माहिती दिली. त्यांच्या व्याख्यानानंतर देशपातळीवरील अनेक वक्त्यांनी त्यांच्याशी व्यक्तिगत संवाद साधून हे कार्य देशपातळीवर लोक चलवळ म्हणून सुरू करणार असल्याचे सांगितले. तर उत्तराखंड येथेही त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.*

– पुनर्विवाह चळवळ पोचली देशपातळीवर!*

*बुलडाणा/वार्ता*

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button