बातमी

गाता रहे मेरा दिल ने प्रेक्षकांचे मन जिंकले…* प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून दान केले पाहिजे – राधेश्याम चांडक

आयुष्यात प्रत्येक जन काही ना काही दु:खाने, आजाराने त्रस्त झाले आहे, परंतु आपण ह्या मतीमंद, विकलांग, दिव्यांग लोकांचे हाल पाहिले तर, त्यामानाने आपलं दुःख काहीच नाही, म्हणूनच आपण आयुष्यात प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून अशा लोकांना मदत केली पाहिजे, असे आवाहन बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी गाता रहे मेरा दिल या चॅरिटीशो च्या उद्घाटनप्रसंगी केले.

येथील सहकार विद्या मंदिर च्या सांस्कृतिक सभागृहात बुलडाणा अर्बन क्रियेटीव्ह ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या गाता रहे मेरा दिल च्या चॅरिटी शो मध्ये दिव्या फाऊंडेशनला संस्थेच्या वतीने एक लाख रुपयांची मदत दिली. यावेळी बुलडाणा अर्बन क्रियेटीव्ह ग्रुपचे आणि सप्तसुर ऑर्केस्ट्राचे सर्व सदस्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या गीताने करण्यात आली. तर या गीतांमध्ये प्रकाश मेश्राम यांनी सुरेख असं नृत्य सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले. तर या कार्यक्रमाचे उत्कृष्ट ॲंकरींग नासिर खान यांनी केले. अनंताभाऊ देशपांडे, तर इंदौर येथील मनीष काबरा, गौरी शिंदे, शितल तायडे, उमेश आजनकर, नरेंद्र राजपूत, सुभाष साबळे यांनी आपल्या गीतात प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. यामध्ये सत्तर-ऐंशी मधील सुपरहिट मेलोडी गीतांवर आधारित गाणी गायली होते.
अनंताभाऊ देशपांडे यांनी राग यमनवर आधारित गाणी सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले.

यामध्ये आशा पारेख, शर्मिला टागोर, हेमामालिनी, मुमताज, या सोबतच माधुरी दिक्षित यांची देखील गाणी सादर केली. या कार्यक्रमाची सांगता अनंताभाऊ देशपांडे यांनी ये मेरे वतन के लोगो या गीतांने करून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. या कार्यक्रमाचे संगीत नियोजन सप्तसुर ऑर्केस्ट्रा यांनी केले तर रंगमंच प्रकाश व नेपथ्य ची जबाबदारी अमोल आढाव यांनी उत्कृष्टपणे सांभाळली. तसेच या कार्यक्रमासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी, पत्रकार तथा बुलडाणा अर्बनचे पदाधिकारी, कर्मचारी व सहकार विद्या मंदिर चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग यांची सेवा करण्याची दृष्टीने , नव्याने निर्माण झालेल्या दिव्य सेवा प्रकल्प वरवंड, जिल्हा बुलडाणा साठी भव्य दिव्य असा चॅरिटी-शो बुलढाणेकरांच्या संगीत रसिक, प्रेमाच्या साक्षीने व आदरणीय अनंताभाऊ व त्यांच्या सप्तसुर ऑर्केस्ट्रा च्या कलाकारांवर अतोनात प्रेम करणाऱ्या संगीत प्रेमींच्या भरगच्च गर्दीने, सहकार विद्या मंदिर येथील भव्य दिव्य सुसज्ज असलेल्या अशा ऑडिटोरियम हॉलमध्ये, गीत गाता चल या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. त्यामध्ये अनंताभाऊ देशपांडे व इतर दिग्गज कलाकारांचे एव्हरग्रीन हिंदी गीत गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. क्लासिकल नृत्य, लहान लहान मुलांची रोमहर्षक कला सादर करण्यात आली.
व्यासपीठावर उपस्थित असलेले भाईजींनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजातील सर्व व्यक्तीकडे काही-ना-काही देण्याची वृत्ती असते, ती मात्र योग्य कार्यावर द्यावयाची प्रेरणा मिळायला हवी, दिव्यांगाची सेवा म्हणजे अतिशय मौल्यवान काम करणाऱ्या, दिव्या सेवा प्रकल्प, वरवंडसाठी एक लाख रुपयांची देणगी देऊन, दिव्या सेवा प्रकल्पाचे संस्थापक श्री. व सौ. काकडे यांचा सहपत्नीक सत्कार व गौरव करण्यात आला. दिव्यांगाची सेवा करण्याचे महान काम दानशुरांनी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button