बातमी
जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा सप्ताह साजरा करा – जालिंदर बुधवत

जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा सप्ताह साजरा करा – जालिंदर बुधवत
बुलडाणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत भगवा सप्ताहाच्या निमित्ताने सूचना केल्या आहेत. त्यामुळे ४ ते ११ ऑगस्ट २०२४ दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात सुद्धा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवा सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे .
या भगव्या सप्ताह अंतर्गत शिवसेना सदस्य नोंदणी करणे , बूथप्रमुखांची नेमणूक करून त्यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे, नवीन मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या दृष्टीने तसेच १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवविवाहित आणि ज्यांची नावे लोकसभेत मतदार यादी मध्ये काही कारणास्तव वगळण्यात आली आहेत किंवा यंत्रणेच्या चुकीमुळे डिलीट झालेले आहेत त्यांची नावे पुन्हा एकदा मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी बीएलए यांच्या मार्फत काम करून घेणे, त्याचप्रमाणे ८५ वरील मतदारांच्या संदर्भामध्ये नाव नोंदणी आणि माहिती गोळा करणे. सोबतच गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या अभियानाची गती या सप्ताह अंतर्गत वाढवणे आदि कामे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अग्रक्रमाने करायचे आहेत. या भगवा सप्ताह निमित्ताने उपरोक्त कार्यक्रम शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राबवावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे.



