‘स्री सन्मान ‘ हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे वैशिष्ट्य राहिलेय!

बावन्न वर्षानंतर महिलेलाच आमदार करण्याचा बुलढाणाकरांचा चंग…

बुलढाणा :

राजकीय सामाजिक जीवनात फुले शाहू आंबेडकर यांना आराध्य दैवत मानत वाटचाल करणाऱ्या आणि
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले ,माता रमाई कन्या ही जयश्रीताई सुनील शेळके यांची ओळख. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आघाडीच्या उमेदवार ही त्यांची आत्ताची ओळख. मात्र 23 नोव्हेंबर च्या संध्याकाळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ही त्यांची नवीन ओळख निर्माण होणार आहे. याचे कारण बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जिजाऊ सावित्री, रमाई च्या लेकींनी आणि पितृतुल्य ज्येष्ठ मतदार, भावानी देखील यंदा जयश्री ताईंना दणदणीत मतांच्या फरकाने विजयी करून बुलढाण्याच्या आमदार करण्याचा मनोमनी निर्धार करून चंगच बांधल्याचे चित्र मतदारसंघात यत्र, तत्र, सर्वत्रच केल्याचे दिसून येत आहे.

बुलढाणा शहर , बुलढाणा तालुका आणि मोताळा तालुक्यातील गावागावात, खेडोपाड्यात या निर्धाराची मशाल पेटलीय.उच्चशिक्षित आणि विनम्र, संयमी पण तितकाच कणखर स्वभाव , त्यांचे वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याने लाखो मतदार प्रभावित झाल्याचे खेडोपाड्यात जाणवत आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघ तसाही पुरोगामी,सुसंस्कृत, उच्चशिक्षित मतदारांचा भरणा असलेला मतदारसंघ आहे. कर्तृत्ववान महिलांचा आदर सन्मान करणारा आणि बुलढाणा शहरात ज्यांचे वास्तव्य झाले अश्या आध्य लेखिका ताराबाई शिंदे यांचा मतदारसंघ आहे. राजकारणात पण बुलढाणा मतदारसंघाने महिलांचा आदर राखून त्यांना मोठी पदे मिळवून दिली. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर झालेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या 1962 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या इंदिराबाई कोटांबकर याना मतदारसंघातीळ पुरुष महिला मतदारांनी पाठबळ देत आमदार केले. 1967 च्या निवडणूक मधे इंदिराबाई कोटांबकर या पुन्हा आमदार झाल्या. यानंतर 1972 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुमनताई शिवाजी पाटील आमदार झाल्या. सुमनताई घाटाखालील मोताळा तालुक्यातील होत्या.

*बुलढाणा मतदार संघाने स्री सन्मान वेळोवेळी केला*

बुलढाणा मतदारसंघातील समंजस पुरुष महिला मतदारांनी स्त्री पुरुष किंवा घाटाखालील किंवा घाटावरचा असा भेद भाव न करता महिला उमेदवारांना निवडून आमदार केले असा इतिहास आहे.
यंदाच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील जयश्री ताई शेळकेंच्या रूपाने पुन्हा एक कर्तबगार, कर्तृत्ववान, उच्च शिक्षित, विकासाची दृष्टी असलेली महिला निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तब्बल 52 वर्षांपासून बुलढाणा मतदारसंघाला महिला आमदार नसल्याने मतदारांना जयश्री ताई शेळके यांच्याबद्धल प्रचंड सहानुभूती आहे. ही सहानुभूतीची लाट संपूर्ण मतदारसंघात पसरली असून त्याच बरोबर राजकीय परिवर्तनाची त्सुनामी लाटही मतदारसंघात तयार झाली आहे. तसेच लाखो सुशिक्षित, बुद्धिजीवी, व्यावसायिक, कर्मचारी, अधिकारी, शांतता प्रेमी, कायदा प्रेमी मतदारांना बुलढाणा मतदारसंघ पूर्वीसारखा शांत, सुसंस्कृत हवा आहे. बुलढाणा शहर आणि मतदारसंघ बिहार उत्तरप्रदेश होणे पसंत नाही. तो गुन्हेगार , अवैध व्यावसायिक, टपोरी मंडळींचा नको आहे. विकास पाहिजे पण हुकूमशाही, दादागिरी, गुंडगिरी, दहशत असलेला नको आहे. यामुळे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता असलेल्या दहशतीचे साम्राज्य संपुष्टात आणण्याची गुंडगिरी तडीपार करण्याची क्षमता असलेल्या जयश्री ताई शेळके यांच्या विजयाचा निर्धार, त्यांना आमदार करण्याचा संकल्प लाखो मतदारांनी यासाठी केला आहे. जयश्री ताई देखील यासाठी कटिबद्ध असून महिला असून दहशत, गुंडाराज विरुद्ध लढा देत आहे. जिजाऊ ,रमाई, सावित्रीच्या या लेकीला एकवेळ संधी द्या तुम्हाला पश्चाताप होणार नाही, संधीचे सोनेच करेल असे सांगतात।त्यांचे हे विनम्र आवाहन बुलढाणा मतदारसंघातील लाखो मतदारांना भावले आहे. यामुळे 23 तारखेला बुलढाण्याच्या आमदार ही जयश्री शेळके यांची नवीन ओळख।तयार होणार हे नक्की…

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *