आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली माजी मंत्री शिंगणे यांची भेट पैनगंगा सहकारी सूतगिरणी पूर्ववत सुरू करण्यासाठी करणार प्रयत्न

आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतली माजी मंत्री शिंगणे यांची भेट
पैनगंगा सहकारी सूतगिरणी पूर्ववत सुरू करण्यासाठी करणार प्रयत्न
मेहकर/प्रतिनिधी
माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे पैनगंगा सहकारी सूतगिरणी,साखरखेर्डा व जिजामाता सहकारी साखर कारखाना दुसरबिड यापैकी दोन्ही प्रोजेक्ट सिंदखेड राजा मतदार संघातील तरुण युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणारे आहेत परंतु गेल्या काही वर्षापासून साखर कारखाना व सूतगिरणी बंद असल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण रोजगारा पासून वंचित आहेत त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून आज मेहकर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांनी दि.४ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शासकिय विश्राम गृह बुलढाणा येथे माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले,व विविध विषयावर चर्चा केली असता माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना पैनगंगा सहकारी सूतगिरणी पूर्ववत करण्यासाठी मदत करावी असे सुचवले तेव्हा आमदार खरात यांनी लगेच म्हटले हा प्रोजेक्ट आपण लवकर सुरू करू आपण म्हणाल ते मी सहकार्य करायला तयार असल्याची ग्वाही खरात यांनी यावेळी दिली तसेच या परिसरातील तरुण युवकांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करणार अशी चर्चा यावेळी झाली.डॉ राजेंद्र शिंगणे हे जेंव्हा कॅबिनेट मंत्री होते तेंव्हा आ.सिद्धार्थ खरात हे त्यांचे स्विय सहाय्यक (खाजगी सचिव) त्यांनी जवळ पास ७ वर्ष काम केले त्यांचे एकमेकांशी अत्यंत घरोब्याचे सबंध आहेत आणि माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे प्रदिर्घ राजकीय अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी आहेत याचा खरात यांना मतदार संघाच्या विकासासाठी नक्कीच फायदा होईल.आमदार सिद्धार्थ खरात यांनी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची भेट पुढील काळात विकासाचे राजकारण आणि मतदार संघात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल यात तिळमात्र शंका नाही.



