बातमी

डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले आणि कसे केले हे छाती फुगून सांगतील पण त्यातून आम्ही आपण काय शिकलो ते मात्र कोणीच सांगत नाही- बाबासाहेब जाधव

डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले आणि कसे केले हे छाती फुगून सांगतील पण त्यातून आम्ही आपण काय शिकलो ते मात्र कोणीच सांगत नाही- बाबासाहेब जाधव
बुलडाणा, (प्रतिनिधी )- संभाजीनगर औरंगाबाद कांचनवाडी येथील राजव्हॅली व साईराजव्हॅली ईलीड सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने सहा डिसेंबर या ६८ व्या महापरिणीर्वाण दिनानिमीत्त विश्वरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत आरोग्य अधिकारी आशाताई भोगे होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव होते. सर्वप्रथम डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मेनबत्ती आगरबत्ती पुष्पानी पुजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्तावीक संभाजीनगर औरंगाबाद मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे असिस्टंट पोलीस इन्सपेक्टर (एपीआय) अनिल कंकाळ यांनी केले.त्यांनी आपल्या प्रस्ताविकेत डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आयकर सहाय्यक अयुक्त शुभांगीताई कंकाळ यांनी १८९१ पासून ते १९५६ पर्यंतच्या जीवन प्रवासात डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या व देशासाच्या विकासासाठी काय काय केले यावर प्रकाश टाकला.
या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे प्रमुख बाबासाहेब जाधव यांनी भारतीय सविधानावर भाष्य केले. जीवनात जर यशस्वी व्हावयाचे असेल तर प्रत्येकांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घेऊन प्रत्यक्षात आचरणात आणावयास पाहीजे तोच व्यक्ती आणि तोच समाज प्रगती पथावर जाऊ शकतो नुसती भाषणबाजी करावयाची डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले आणि कसे केले हे छाती फूगून सांगतील पण त्यातून आम्ही आपण काय शिकलो ते मात्र कोणीच सांगत नाही. तर पहीले आपण स्वत: डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करा व तसे वागा व नंतर इतरांना सांगा हाच डॅा.बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रध्दांलजी ठरेल असे विचार बाबासाहेब जाधव यांनी ६८ व्या महारिणीर्वाण दिनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी दिपाताई कंकाळ, बॅंक मॅनेजर अंकीत भोगे, मुकुंद मिसाळ, डॅा.राणी कंकाळ, विलास मनोहर, सुभाष सूर्यनारायण, मायाताई मिसाळ, हर्षालीताई प्रतिक भोगे, अंसू अनिल कंकाळ, पुणमताई अंकीत भोगे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आदर्श शिक्षक प्रतिक भोगे यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजिनियर व्दिज अनिल कंकाळ यांनी केले.
कार्यक्रमासाठी सोसायटी मधील बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थीत होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button