आ.सिद्धार्थ खरातआज घेणार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन

आ.सिद्धार्थ खरातआज घेणार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन
मेहकर/प्रतिनिधि
मेहकर लोणार मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार यांनी नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन व राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मरण करून महाराष्ट्र विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतल्या नंतर ते पहिल्यांदाच मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे येत असून सकाळी 9 वाजता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचे दर्शन घेऊन आपल्या कामाची सुरुवात करणार आहेत,आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात हे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेले असून ताड शिवणी सारख्या दुर्गम गावातून माध्यमिक शिक्षण की.राजा राजा येथे घेऊन महाविद्यालयीन पदवी व पदवीनंतर चे शिक्षण औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेज येथे घेतले आहे,त्यांना शिव शाहू फुले,आंबेडकरी चळवळीचे बाळकडू मिळाले आहे, तर एकीकडे शिक्षण घेत व चळवळीत काम करत असताना पहिले लोकमत सारख्या मोठ्या वृत्तपत्रात पत्रकारिता केली नंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा पास करून आधी पी एस आय, तहसीलदार व मंत्रालयीन कक्ष अधिकारी ते सर्वच महत्वाच्या खात्यात सहसचिव म्हणून सक्षम पने काम केले आहे,तर पत्नी लोकसेवा आयोगाच्या सचिव आहेत मुलगी डॉ सांची हिचे एम एस पूर्ण झाले व मुलगा सार्थ हा एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे अतिशय सुख सोई सुविधा उपलब्ध असताना सुद्धा त्यांची नाळ मात्र कायम आपल्या गावाशी,गावातील आणि परिसरातील सहकाऱ्यांशी जोडलेली राहिली,मंत्रालयात नोकरी जरी करत असले तरी त्यांनी गावाकडील सहकारी मात्र सोडले नाही त्यामुळे त्यांना नोकरी करत असताना ग्रामीण भागातील समस्या जवळुन पाहिले आहेत प्रत्यक्षात अनुभवल्या आहेत म्हणून त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन सरळ राजकारणात येऊन प्रत्यक्ष जनतेचे सेवा करण्यासाठी त्यांनी संकल्प करत मेहकर लोणार मतदार संघात विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरविले व येथील जनतेला खरा न्याय मिळवून द्यायचा हा त्यांनी निर्धार केला व उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत झालेली गद्दारी त्यांना सहन झाली नाही म्हणून त्यांनी सरळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत चर्चा मसलत करून आपल्या पारड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी म्हाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि शिवसेना जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, तालुका अध्यक्ष निंबाभाऊ पांडव,युवा सेनेचे ॲड.आकाश घोडे, मेहकर शहर अध्यक्ष किशोर भाऊ गारोळे,ॲड.संदीपभाऊ गवई यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून निवडणुक लढण्याचा निर्णय घेऊन निवडणूक लढली आणि यशस्वी सुद्धा झाले आता ते मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार म्हणून शपथविधीनंतर पहिल्यांदाच मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे येत आहेत ते सकाळी 9 वाजता राजमाता जिजाऊ व डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करणार आहेत तरी मातृतीर्थ सिंदखेडराजा व मेहकर लोणार मतदार संघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सिद्धार्थ खरात मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



