बातमी

बारदान्या अभावी बंद झालेली शासकीय खरेदी सुरू करा.. शिवसेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

शिवसेना (उ बा ठा) पक्षाचा आंदोलनाचा इशारा...

बारदान्या अभावी बंद झालेली शासकीय खरेदी सुरू करा.. शिवसेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

शिवसेना (उ बा ठा) पक्षाचा आंदोलनाचा इशारा…

बुलढाणा( आदर्श नेतृत्व)
शेतमालाला मार्केटमध्ये योग्य भाव मिळत नसल्याने नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी सुरू करण्यात आली परंतु सदर खरेदी बारदाण्याअभावी बंद पडली आहे.
शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन साठा असून ती खरेदी अतिशय संत गतीने सुरूआहे सदरील माल केंद्रावर बोलावून मालावर माऊसच्या किडी, डागी आहे असे प्रमाण देऊन शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेना उ बा ठा पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना शासकीय खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले
शेतकरी या शासकीय खरेदीवरच आशा लावून बसला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतमाल नोंदणी केली आहे परंतु खरेदी बंद अवस्थेमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमाल हा कवडीमोल भावात विकावा लागत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी केंद्र येथे बारदाना पुरवून खरेदीला सुरुवात करण्यात यावी तसेच संपूर्ण शेतकऱ्यांची घरात असलेली सोयाबीन मोजून होईपर्यंत खरेदी केंद्र बंद बंद करू नये अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना उ बा टा पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देखील या दिलेले निवेदनात करण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनावर जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत एड जयश्रीताई शेळके लखन गाडेकर संदीप शेळके, आशिष खरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button