बातमी

बुध्द चरित्र भगवंत कथेची अमृतवर्षा” सहकार विद्या मंदिरमध्ये – राधेश्याम चांडक

बुध्द चरित्र भगवंत कथेची अमृतवर्षा” सहकार विद्या मंदिरमध्ये – राधेश्याम चांडक

बुलडाणा
सद्भावना सेवा समिती आणि सिंहनाद सेवासंघ बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सहकार विद्या मंदिर सभागृहामध्ये महापंडीत पुज्य सध्दर्माचार्य भिक्षु प्रियदर्शी थेरोजी पाली बौध्द साहित्य एवं संस्कृत बौध्द साहित्याचे प्राध्यापक प्रकाण्ड विद्वान प्रांकेलनिया युनिव्हर्सिटी, श्रीलंका यांचे त्रिदिवसीय कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेची वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत राहील. जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुध्दाचे निष्ठावान अनुयायी भन्ते प्रियदर्शी थेरोजी यांच्या अमृतवाणीतुन बुध्द चरित्र श्रवण करायला मिळणार आहे. बुलडाणा शहरात आणि महाराष्ट्रात प्रथमच अश्याप्रकारच्या कथेतुन बुध्दचरित्रचे आयोजन होत आहे. याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले.

देश विदेशात प्रियदर्शी थेरोजी यांनी बुध्द चरित्राच्या कथा केल्यानंतर बुलडाणा येथे त्यांचे आगमन होत आहे. आज जगाला युध्द नव्हे बुध्द ची आवश्यकता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात करोडो वर्षानंतर गौतम बुध्दा सारखे व्यक्तीमत्व जन्माला येते अशा महामानवाचे चरित्र बुलडाणेकरांना श्रवण करायचे भाग्य लाभले आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे असे भावपुर्ण प्रतिपादन भाईजी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स‌द्भावना सेवा समितीचे सर्व पदाधिकारी आणि सिंहनाद सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. यामध्ये विजय वाकोडे अध्यक्ष सिंहनाद सेवासंघ, घिरके फुड ॲण्ड ड्रग कमीशनर, समाजभुषण दिलीपभाऊ , सुमित सरदार, शैलेश भंडारे, गजानन जाधव, प्रशांत इंगळे, निवृत्ती सरकटे, सोनाजी दाभाडे, सुरेशचंद्र गट्टाणी, सिध्दार्थ शर्मा, प्रा. प्रकाशचंद्र पाठक यांचा समावेश आहे. तथागत गौतम बुध्दाच्या कथेतुन बुध्दचरित्र या दिव्य सत्संगाचा लाभ प्रकांड विद्वान प्रियदर्शी थेरोर्जीच्या अमृतवाणीतुन घ्यावा असे आवाहन राधेश्याम चांडक यांनी केले आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button