बातमी

आपण भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य व जबाबदारी पाळायला हवी.. ठाणेदार नरेंद्र ठाकरे

चालक दिवस साजरा.. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांचाही सत्कार...

जिल्हा पोलीस दल वाहतूक नियंत्रण शाखा बुलढाणा च्या वतीने रस्ता सुरक्षा कार्यशाळा संपन्न…

चालक दिवस साजरा.. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांचाही सत्कार…

बुलढाणा:

बुलढाणा जिल्हा पोलिस दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून वाहतूक नियम व रस्ता सुरक्षा कार्यशाळा व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा तसेच राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा रस्ता सुरक्षा अभियान 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा बसस्थानकावर करण्यात आले होते. यावेळी
शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्नील नाईक, यंत्र अभियंता नितीन जयस्वाल, डेपो मॅनेजर अमोल गडलिंग, प्रमोद इंगळे, चैतन्य गोलेच्छा,राहुल चव्हाण, नितीन गावंडे यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच आज 24 जानेवारी रोजी चालक दिन साजरा करण्यात आला यावेळी राज्य परिवहन महामंडळातील उत्कृष्ट चालकांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला
यावेळी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून अपघातग्रस्तांना त्वरित मदत करा अपघातग्रस्तास मदत केल्यावर कोणत्याही व्यक्तीस कायदेशीर कारवाई स तोड द्यावे लागणार नाही रस्त्यावरील अपघात ग्रस्त लोकांना मदत करण्यास संकोच किंवा कोणतीही भीती बाळगू नका अपघातग्रस्तांना मदत केल्यास रिवॉर्ड देखील देण्यात येतो तसेच
हेलमेट वापरा, सीटबेल्टचा वापर करा, नशाकरुन वाहन चालवू नका, अपघात प्रसंगी जख्मीना मदत करा, रस्ता सुरक्षा ‍नियम पाळा असा संदेश देण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे मार्गदर्शन करत असताना म्हणाले की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणाऱ्या (चालक) वर वाहनांमधील सर्व प्रवाशांच्या परिवाराची जबाबदारी असते! खरंच आपण नियम पाळतो का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला शहरातील कारंजा चौक संगम चौक जयस्तंभ चौक व इतरत्र ठिकाणी अस्त-व्यस्थ पणे आपली वाहने आपण पार्किंग केल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. परंतु आपण भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य अधिकार व जबाबदारी आवर्जून पाळायला हवी असे मत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस दल जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा
राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता तर मोठ्या संख्येने चालक व नागरिक सहभागी झाले होते

सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्नील नाईक,

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button