आतंरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त बुलढाणा येथे निघाली सहकार दिंडी….!

आतंरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त बुलढाणा येथे निघाली सहकार दिंडी….!
बुलढाणा:- आतंरराष्ट्रीय सहकार दिनाचे आयोजन 9 फेब्रुवारी ला नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले त्या निमित्त जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे सहकार रैली चे आयोजन बुलढाणा या ठिकाणी करण्यात आले होते आज दि 1 फेब्रुवारी रोजी बुलढाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्याम जी चांडक यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पतसंस्था अध्यक्ष पदधिकारी कर्मचारी या रैली मध्ये सहभागी झाले होते या रैली मुळे बुलढाणा आज सहकार मय झाले होते.
चिखली रोडवरील साई लॉन्स या ठिकाणापासून या सहकार रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.संपूर्ण बुलढाणा शहरात रॅली फिरवण्यात आली.
या वेळी बुलडाणा अर्बन चे संस्थापक मा. अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलडाणा अर्बन चे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर, सहकार विद्या मंदिर च्या कोमलताई झंवर, शाहू बॅंकेच्या अध्यक्ष संदीप शेळके, मालतीताई शेळके, शिवसाई बँकेचे अध्यक्ष डि.एस लहाने,मराठा अर्बन बँकेचे अध्यक्ष जेऊघाले,मा जिजाऊ अर्बन बँकेचे शिवाजी तायडे,गंगा अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, या सह अनेक बँकेचे अध्यक्ष उपस्थित होते.





