चिखली एसटी कास्ट्राईबच्या डेपोध्यक्षपदी प्रताप वानखडे तर डेपोसचिवपदी संतोष घेवंदे

चिखली एसटी कास्ट्राईबच्या डेपोध्यक्षपदी प्रताप वानखडे तर डेपोसचिवपदी संतोष घेवंदे
चिखली,(प्रतिनिधी)- केंद्रीय व राज्य अनुसुचित जातीजमाती आयोगाची एकमेवमान्यताप्राप्त राज्यपरिवहन कास्ट्राईब कर्मचारी संघटनेची चिखली आगाराची २०२५ ची वार्षिक सर्वसाधारण बैठक दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी चिखली येथे आयोजीत केली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थानी जेष्ठ चालक पी.पी. खरात यांनी भूषविले. सर्वप्रथम फुले,शाहू,आंबेडकर, माताजिजाऊ, मातारमाई यांच्या विचारांना नतमस्तक होऊन बुध्दवंदना घेऊन बैठकीची सुरवात करण्यात आली. नंतर जिल्हाभरातील पदाधिकारी सभासदाचा चिखली आगाराच्या वतीने सर्वांचा परिचय करून सत्कार करण्यात आला.
आमरावती प्रदेशीकध्यक्ष जिवन जाधव, विभागीयध्यक्ष दिपक मोरे, प्रताप वानखेडे यांनी संघटनेची ध्येय धोरण, संघटनेची आवश्यकता व संघटने प्रति आपले कर्तव्य या संदर्भाने मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले विभागीय सचिव भारत आराख व विभागीयध्यक्ष दीपक मिसाळकर यांनी संघटने बाबतीमध्ये सखोल मार्गदर्शन करून सेंट्रल पातळीवर सुरू असलेल्या संघटनेच्या ध्येय धोरणाबाबत सखोल माहिती दिली. यानंतर चिखली आगार कार्यकारिणीची लोकशाही पद्धतीने निवड करण्यात आली. या मध्ये प्रताप वानखेडे यांची चिखली आगारध्यक्षपदी तर संतोष घेवंदे यांची चिखली डेपोसचिव म्हणून सर्वांनूमते फेरनिवड टाळ्याच्या आवाजात करण्यात आली त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या भावी पूढील वाटचालीसाठी उपस्थीतांनी शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक जीवन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे एकनिष्ठ सभासद विनोद झीने यांनी केले. सदर कार्यक्रमाला विभागीय पातळीवरील ज्येष्ठ नेते आत्माराम चोतमोल, प्रल्हाद कांबळे,गणेश झोटे दादा,के.व्ही. प्रधान, विभागीय अध्यक्ष भारत आराख, विभागीय सचिव मिसाळकर , जितू साळवे, बुलडाणा डेपोध्यक्ष रवी अवसरमोल, मलकापूर येथील संघटनेचे विधीसल्लागार ज्येष्ठ नेते सिद्धार्थ खराटे, नितीन शेळके,संजय कस्तुरे, तर चिखली आगार येथील कास्ट्राईब संघटनेचे सभासद नितीन पवार, आनील हातागळे, अरविंद जाधव, अतुल सरकटे, सचिन सरदार,रमेश पैठणे, समाधान गवई, आर.पी. मिसाळ, संतोष इंगळे, शेषराव इंगळे, विनोद झीने, अमोल घेवंदे, नितीन लहाने, सौ.खरात ताई, श्रीमती जोत्सना जाधव ताई,ए.बी. पैठने,आर.एस.सरकटे तसेच बुलडाणा विभागातील पदाधिकारी सभासद बहुसंख्येने उपस्थीत होते.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



