मनीष रमेशराव पावडे यांना राष्ट्रीय संत गाडगेबाबा समाजभूषण पुरस्कार जाहीर

*मनीष रमेशराव पावडे यांना राष्ट्रीय संत गाडगेबाबा समाजभूषण पुरस्कार जाहीर*
बुलडाणा पहाटे फाउंडेशन संभाजीनगर यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त गजानन बाबा शेगाव येथे 23 फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराची आयोजन करण्यात आले आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अमरावतीचे सर्वज्ञ फॉउंडेशन रोटी बँकेचे संस्थापक अध्यक्ष मनीष रमेशराव पावडे यांची सामाजिक व इतर कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ह्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी १० वाजता वर्धमान जैन भवन, रेल्वे स्टेशन जवळ शेगाव जि बुलढाणा येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सरस्वती नगर अमरावती येथे सर्वज्ञ् फाउंडेशन ही संस्था निराधारांना आधार देण्याचे सामाजिक कार्य गेल्या आठ वर्षापासुन करीत आहे. स्व. रमेश पावडे यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या संस्थेचे अध्यक्ष मनिष पावडे व सचिव सौ वैशाली पावडे व त्यांचे सहकारी आठ वर्षापासून नियमित काम सुरू आहे. संस्थेचे कार्य- रोज अन्नदान, थंडीमध्ये ब्लँकेट वाटप, उन्हाळ्यामध्ये पाणपोई, निराधार बांधवांना चप्पल वाटप, अंध विद्यालय मध्ये साहित्य वाटप, निराधार लोकांचे कटिंग दाढी, रुग्णांना मदत, अपंगांना मदत, झाडे लावणे व जगणे, पक्ष्यांसाठी घरटी तयार करणे,अशाप्रकारे आठ वर्षापासून उपक्रम सुरू आहे. रोडवरील निराधार बांधवांना नियमित अन्नदान सुरू आहे.
पहाटे फाउंडेशन संभाजीनगर यांनी कार्याची दखल घेऊन अमरावती जिल्हा मधून मनीष रमेशराव पावडे शेगाव येथे सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.



