बातमी

शिवाजीराव तायडे, सौ.सवडदकर  यांना पुरस्कार जाहीर 

शिवाजीराव तायडे, सौ.सवडदकर  यांना पुरस्कार जाहीर 

बुलढाणा 
         महाराष्ट्र मराठा सोयरीक या सामाजिक लोक चळवळीच्या वतीने समाजासाठी निस्वार्थपणे सेवाभावी दृष्टिकोनातून काम करणाऱ्या समाज बांधवांना दरवर्षी वधुवर परिचय मेळाव्यामध्ये सन्मानित केल्या जाते.
यावर्षी शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे महाराष्ट्र मराठा सोयारिकच्या वतीने भव्य असे वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. सदर मेळाव्यामध्ये “समाज रत्न”हा पुरस्कार सौ. मालिनीताई सवडदकर यांना व जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष अंभोडा निवासी शिवाजीराव तायडे यांना “अंभोडा भूषण”हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मुक्ताईनगरचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याहस्ते बोदवड येथील वधुवर परिचय मेळाव्यामध्ये दिल्या जाणार आहे. 
    शिवाजीराव तायडे व  सौ. सवडदकर   हे गेल्या आठ-दहा वर्षांपासून महाराष्ट्र मराठा सोयरीक या लोक चळवळीशी जोडल्या गेलेले आहेत. दोघांचेही समाजासाठी अतुलनीय असे योगदान आहे. सवडदकर ह्या ज्येष्ठ साहित्यिका आहेत. त्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक जटील झालेले प्रश्न ऐरणीवर आणून ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. सौ. सवडदकर ह्या उच्चशिक्षित असून सहाय्यक महाव्यवस्थापक बीएसएनएल या पदावरून त्यांनी स्वच्छने सेवानिवृत्ती पत्करली आहे. विशेष म्हणजे त्या कादंबरीकार सुद्धा आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांना प्रथम पुरस्कार मिळालेले आहेत. संबंध जोडणीचाही छंद त्यांनी जोपासलेला आहे. पाचशेच्या वर संबंध जोडून त्यांनी अनेकांचे संसार फुलविले आहेत. तर शिवाजीराव तायडे हे सहकाराच्या माध्यमातून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचा संसाराचा गाडा हाकलायला हातभार लावीत असतात. स्व:तच्या गावांसाठी सुद्धा त्यांची मोठी कामगिरी आहे. प्रत्येक मेळाव्यात येणाऱ्या लेकरांच्या पोटात दोन घास जावेत म्हणून भोजन व्यवस्थेसाठी दरवर्षी त्यांचा मोठा सहभाग असतो. नुकत्याच बुलढाणा येथे संपन्न झालेल्या मेळाव्यामध्ये दोघांनीही अतुलनीय अशी कामगिरी केली, त्याचे समाजाच्या वतीने कौतुकही झाले. येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती दिनी बोदवड येथे वधु-वर परिचय मेळावा संपन्न होत आहे. याचा लाभ जास्तीत जास्त बहुसंख्य समाज बांधवांनी घ्यावा, असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे बुलढाणा जिल्हा महिला मराठा सोयरीक संघाच्या अध्यक्षा सुरेखा सावळे यांनी कळविले आहे.
Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button