वढव ते शेंदुर्जन ३८ किमी रस्त्याचे भूमिपूजन…
मेहकर मतदारसंघात विकास पर्वाला सुरुवात झाली : आ. सिद्धार्थ खरात

*वढव ते शेंदुर्जन ३८ किमी रस्त्याचे भूमिपूजन…*
*मेहकर मतदारसंघात विकास पर्वाला सुरुवात झाली : आ. सिद्धार्थ खरात*

मेहकर: मेहकर लोणार मतदार संघातील अनेक प्रश्नांना आमदार झाल्यापासून हात घातला आहे. दोन महिन्याच्या काळत वढव गावासाठी १० लाख रुपयांचा निधी दिला आहे. आता वढव ते शेंदुर्जन हा लांबीने ३८ किलोमीटरचा तर रुंदीने ७ मीटरचा रस्ता लवकरच पूर्ण होणार असल्याने खऱ्या अर्थाने मेहकर मतदारसंघात विकास पर्वाला सुरुवात झाली, असे प्रतिपादन आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले.
वढव येथे गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी वढव ते शेंदुर्जन रस्त्याचे भूमिपूजन आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेंदुर्जन, राजेगाव,सुलतानपूर, वेणी, हिरडव, वढव रस्त्याच्या कामासाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेतला आहे. या रस्त्याचे 28 किलोमीटरचे काम मेहकर मतदार संघात असल्याने याचा फायदा नागरिकांना होणार आहे.
दरम्यान उबाठा पक्षाच्या तालुकाप्रमुख सौ तारामती जायभाये यांच्या हस्ते आमदार सिद्धार्थ खरात यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच पती विजय सोनुने, नंदकुमार सोनुने, ग्रामसेवक सानप, संतोष वाठोरे, विजय मोरे,अंकुश सोनुने, बद्री सानप, गजानन तनपुरे, मंगेश मोरे, गजानन मोरे, स्वप्नील हाडे, सत्यनारायण वाठोरे, गजानन वाठोरे, नारायण चाटे, डॉ सार्थ खरात,मुक्ताबाई महिला भजनी मंडळ व बारी, महादेव भजनी मंडळ यांच्यासह वढव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*निधीची कमतरता भासणार नाही*
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची नुकतीच भेट घेतली असल्याचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले. मतदारसंघातील रस्त्यांच्या प्रश्नांवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी सहकार्यची भूमिका दाखवली असून निधीची कमतरता भासणार नाही, असेही आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले.



