पुनम क्षीरसागर समाजसेवा अधीक्षक मनोविकृती* *यांचा महिला दिनी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सन्मान*

पुनम क्षीरसागर समाजसेवा अधीक्षक मनोविकृती*
*यांचा महिला दिनी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सन्मान*
बुलढाणा
जिल्हा सामान्य रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक मनोविकृती- पूनम क्षीरसागर काळवाघे यांचा जागतिक महिला दिनी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.स्त्री रुग्णालय / वैद्यकीय महाविदयालय येथे हा कार्यक्रम आज 8 मार्च रोजी पार पडला.वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर कैलास झीने व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

समुपदेशन ही काळाची गरज आहे. समुपदेशनाने तुटणारे संसार सुरळीत चालतात. समुपदेशनाने भंगणारे जीवन पूर्वपदावर येते.जिल्हा रुग्णालयात ही महत्त्वाची भूमिका पार पाडतात त्या समाजसेवा मनोविकृती अधीक्षक पुनम क्षीरसागर….त्या बुलढाणा जिल्हा रुग्णालय समाजसेवा अधीक्षक मनोविकृती पदावर कार्यरत आहे.आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला. तणावग्रस्त कुटुंब किंवा समुपदेशनाची गरज असणाऱ्या व्यक्तींना त्या सातत्याने मार्गदर्शन करीत असतात.
आपल्या कृतिशील कार्यकर्तव्यातुन महीला व बालकांच्या क्षेत्राबरोबरच ज्येष्ठ नागरीक, निराधार, गरजु आणि वंचित घटकांना सोबत घेऊन त्यांना सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी
मोलाचे योगदान त्या देत आहे. या कार्यामुळे
समाजातील अनेक व्यक्तींना काम करण्यासाठी प्रेरणा ऊर्जा मिळाली आहे.याची दखल घेत “जागतिक महीला दिनानिमीत्त” आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सन्मान पत्रा द्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित केले.
बुलढाना जिल्ह्यातील प्रथम समाजसेवा अधीक्षक मनोविकृती या पदावरील त्या पहिली महिला आहे. त्यांना हे सन्मान पत्र प्राप्त झाले ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे .



