*बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून महाबोधी महाविहार आंदोलनाची घोषणा*

*बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून महाबोधी महाविहार आंदोलनाची घोषणा*
बुलडाणा दि 10 मार्च 2025 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून विश्राम भवन बुलढाणा येथे मिटिंगचे आयोजन केल्या गेले होते. जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विनोद पवार यांच्या नेतृत्वात जिल्हा नियोजन कमिटी गठीत करण्यात आली सोबतच येता 15 मार्च 2025 रोजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन रॅली ची घोषणा करण्यात आली तसेच पदनियुक्तीचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला…
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या युवा जिल्हा अध्यक्ष पदी सागर मोरे, उपजिल्हाद्यक्ष सुजित बांगर, महासचिव पदी विजय इंगळे,जिल्हा संघटक मनोहर वाघ, जिल्हा सह सोशल मीडिया प्रभारी रिजवान शेख, जिल्हा सहसंघटक तेजराव तायडे, बुलढाणा शहर अध्यक्षपदी विलास भिसे, शहर उपाध्यक्ष प्रशांत कस्तुरे, जिल्हा संपर्क प्रमुख शेख. नूर. शेख. अय्युब खामगांव शहर अध्यक्षपदी सय्यद अफसर, बहुजन रिपब्लिकन विध्यार्थी मोर्च्याच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी महेंद्र मोरे यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा अध्यक्ष विनोद पवार म.रा. सचिव शेख. आबेद उपस्थित होते.



