बातमी

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन…

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा उपक्रम...

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन…

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा उपक्रम…

 

बुलढाणा भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्या असून याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय त्याच अनुषंगाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलडाणा च्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव निमित्त संविधानावर आधारित स्पर्धा परीक्षेचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे.

भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाले असून देशभरात संविधानाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. त्याच अनुषंगाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता 8 वी ते 12 व खुल्या प्रवर्गासाठी भारतीय संविधान सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात येणार आहे. संविधानातील मूलभूत तत्व हक्क व अधिकार यांचे जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून या सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेमध्ये बुलढाणा शहरातील जवळपास 10 हजार विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत यासाठी उत्सव समितीच्या वतीने तयारीला सुरु आहे

या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा यासाठी ऑनलाइन आपले अर्ज नोंदवावे तसेच खालील दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक वर संपर्क साधावा..

स्पर्धेत दोन्ही गटास प्रथम 3000 रुपये द्वितीय 2000 हजार रुपये व तृतीय 1000 रुपये व प्रोत्साहन पर दोन बक्षीस प्रशस्तीपत्र व मोमेंटो देण्यात देण्यात येणार आहे.
तरी या परीक्षेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष निलेश राऊत कार्याध्यक्ष डॉ. अर्चित हेरोळे, सचिव दीपक मोरे, कोषाध्यक्ष अमोल वाठोरे, व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा 2025 च्या वतीने करण्यात आले आहे.

 

सामान्य ज्ञान स्पर्धा – 2025

*_खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे._*

भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी *”संविधानावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा”* आयोजित करण्यात येत आहे.
*विद्यार्थी, संविधान प्रेमी आणि अभ्यासकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे.*
सविस्तर माहितीची PDF रजिस्ट्रेशन लिंक मध्ये दिलेली आहे.

1. शालेय गट (8 ते 12 वीचे विद्यार्थी)
2. खुला गट (वरिष्ठ महाविद्यालय व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी)
3. प्रवेश फी: ₹ 20
(प्रवेश फी मध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बुकलेट देण्यात येईल)

https://forms.gle/8RdjCZ6H8a5dZor47

*रजिस्ट्रेशन लिंक दि. 9 एप्रिल 2025, सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत सुरू राहील.*

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button