सम्राट अशोक जन्मोत्सवानिमित्त शनिवारी आरोग्य तपासणी व रोजगार मेळावा

सम्राट अशोक जन्मोत्सवानिमित्त शनिवारी आरोग्य तपासणी व रोजगार मेळावा
राष्ट्रपिता महात्मा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीउत्सव समितीचा पुढाकार…

बुलढाणा, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक 5 जानेवारी प्रियदर्शी चक्रवती सम्राट अशोक जन्मोतस्वानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन ५ एप्रिल, शनिवार रोजी बुलढाणा येथील जयस्तंभ चौकस्थित गांधी भवनच्या प्रांगण्यात करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पुढाकारातून होत असलेला कार्यक्रम सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत पार पडणार आहेत. नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
विश्वकौशल्य स्किल अँड एम्पोरमेन्ट खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहयोगातून दोन्ही कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैय्यासाहेब पाटील हे असणार आहेत. जिल्हा कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त गणेश बिटोडे यांच्याहस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. तर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्याहस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन होईल. प्रियदर्शी सम्राट अशोक यांची जयंती देशभरात ५ एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्यात येते. दरम्यान, विविध कार्यक्रम यानिमित्ताने पार पडतात. त्यानुसार, बुलढाणा येथे मोफत आरोग्य तपासणी व बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून नागरिकांना विविध आजाराचे निदान होवून उपचाराबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. याशिवाय नामांकित संस्थेमार्फत बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी दहावी, बारावी उतीर्ण, व विविध विषयात पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
https://forms.gle/9mdpvZnCYw5f42g69
रोजगार मेळाव्यासाठी वरील लिंक वर माहिती भरा
https://forms.gle/ncGaiA9TrMJZiqQG9
मोफत आरोग्य शिबिरासाठी वरील लिंक वर माहिती भरा
लिंक वर वर नोंदणी करावी…



