मा. उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मुंबईत येतोय:-आमदार सिद्धार्थ खरात !!

मा. उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मुंबईत येतोय:-आमदार सिद्धार्थ खरात !!
मुंबई स्थित कांदिवली पोयसर बेस्ट आगारात महात्मा फुले व डॅा बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. या वेळी मेहेकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ..
सिद्धार्थ खरात हे गृहविभागात परिवहन व बंदरे विभागाचे सहसचिव असतांना मागील वर्षी यांच आगारात जयंतीसाठी आले होते .. या वर्षी देखिल कांदिवली पोयसर बेस्ट आगारातील वाहक- चालक व इतर कर्मचारी-यांनी श्री खरात यांनाच बोलाविण्याबद्दल आग्रह धरला होता.. मतदार संघात अत्यंत व्यस्त कार्यक्रम असतांना सुद्धा आमदार सिद्धार्थ खरात हे या कार्यक्रमास उपस्थित राहीले ..
या वेळी बोलतांना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की “ छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतीराव फुले, डॅा बाबासाहेब आंबेडकर व समाजसुधारक हे महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांचेमुळेच महाराष्ट्राचा नावलौकीक ख-या अर्थाने वेगळा आहे.. जाती जातीत महापुरूषांना वाटून भांडणे लावून मते घेण्याचे राजकारण करण्यात येत आहे. अशा वेळी आपण सर्वांनी सजग राहून त्यांचे विचारांवर काम करावे असे प्रतिपादन केले.
तसेच पुढे बोलतांना आमदार खरात म्हणाले की मला निवडून आणण्यासाठी कांदिवली पोयसर व मुंबईतील ठिकठिकाणच्या कर्मचारी व कार्यकर्त्यांनी माझ्या मतदारसंघीतील मतदारांना फोन करून सांगितले . त्यामुळे मी मेहकर – लोणार मतदारसंघाबरोबरच मुंबईतील जनतेचा सुद्धा प्रतिनिधी आहे. त्यामुळे मुंबई भागात माझ्या जनतेवर कोणताही अन्याय झाल्यास त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहीन ..
तसेच शिवसेनाप्रमुख मा . उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी व त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी संभांजीनगर , जालना, बुलडाणा , वाशिम व अकोला भागातील लाखो मतदारांच्या सहाय्याने २५ ते ३५ नगरसेवक आपणांस निवडूण द्यायचे आहेत..त्यासाठी मी मुंबईत येतोय “.
यावेळी बेस्ट संघटना अनुसुचित जाती- जमाती वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र साळवे, श्री गणाचार्य , विजय संपत ससाणे केशव शिवणी प्ररमेश्वर काकड अंढेरा प्रदीप गवई तढेगाव सचिन शेजुळ चांगेफळ ,इंगळे साहेब ,गायकवाड साहेब राकेश घोत्रे ( कोकण ) व बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



