मातृतीर्थ सिंदखेडराजाचे भूमिपुत्र उज्वलकुमार म्हस्के दर्जेदार शैक्षणिक निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल सन्मानित

मातृतीर्थ सिंदखेडराजाचे भूमिपुत्र उज्वलकुमार म्हस्के दर्जेदार शैक्षणिक निर्मिती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल सन्मानित
बुलडाणा,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर द्वारे आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाचे भूमिपुत्र उज्वलकुमार म्हस्के यांनी फुलंब्री तालुक्यात सर्वप्रथम क्रमांक पटकाविला. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद येथे सहशिक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या उज्वलकुमार म्हस्के यांनी इयत्ता सहावी ते आठवी या गटात विज्ञान विषयात उत्कृष्ट शैक्षणिक व्हिडिओ बनवून हे यश मिळविले.मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे दि.३० एप्रिल २०२५ रोजी आयोजित शानदार सन्मान सोहळ्यात मा. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उज्वलकुमार यांचा त्यांची पत्नी मेघा उज्ज्वलकुमार म्हस्के सह सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
उज्वलकुमार म्हस्के यांच्या या यशस्वीतेबद्दल फुलंब्री पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर,शिक्षण विस्तार अधिकारी आर.डी.महाजन,आळंद केंद्राचे केंद्रप्रमुख संजय भूमे,वाकोद जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश ताठे तथा सर्व पदाधिकारी,शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल वेळे तथा सर्व शिक्षकवृंद यांनी उज्वलकुमार म्हस्के यांचे अभिनंदन केले, बुलडाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे म्हणून बुलडाणा जिल्हा रिपाई आठवलेचे जिल्हासंपर्कप्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी जिल्ह्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले या सन्माना बद्दल त्यांच्यावर मित्र, नातेवाईकांचा बुलडाणा जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



