बातमी

जुन्या जाणत्या शिवसैनिकांसोबत गप्पा मारण्यात रमले आमदार सिद्धार्थ खरात

जुन्या कट्टर शिवसैनिकांनी उजळवल्या जुन्या आठवणी

जुन्या जाणत्या शिवसैनिकांसोबत गप्पा मारण्यात रमले आमदार सिद्धार्थ खरात

  • जुन्या कट्टर शिवसैनिकांनी उजळवल्या जुन्या आठवणी

बुलढाणा
शिवसेना म्हटली की आठवतो करारी बाणा आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे परंतु अलीकडच्या काळात सत्तेसाठी शिवसेनेत उभी फूट पडली आणि त्यामध्ये जुन्या शिवसैनिकांची उघडपणी नाराजी व्यक्त केली याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाला परंतु ते चित्र विधानसभेत कायम राहू शकले नाही यामुळे पुन्हा सच्चा शिवसैनिकांची मन नाराज झाली परंतु बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात हे निवडून आल्याने सच्चा शिवसैनिकांमध्ये एक चेतना निर्माण झाली आहे
याचाच प्रत्यय आज एका ठिकाणी आला तो म्हणजे बुलढाणा येथे लग्न समारंभासाठी भेट देण्यासाठी आले असता 90 च्या दशकातील सच्चे शिवसैनिक आमदार सिद्धार्थ खरात यांना भेटले व त्यांची एकच मैफिल रंगली यावेळी पूर्वीची शिवसेना आणि विभागणीनंतर झालेल्या शिवसेने संदर्भात चर्चा झाली व चर्चेदरम्यान जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आपण निवडून आल्या नंतर आमच्या मनात एक नवचेतना निर्माण झाली असल्याची जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी बोलून दाखवले आणि यापुढे देखील आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावासोबतच काम करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांना दिली

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button