बातमी

ट्रक, मोटर सायकल व कार मध्ये भीषण अपघात…

घाटनांद्रा येथील पती-पत्नी व मुलाचा अपघातात जागीच मृत्यू..

  • ट्रक, मोटर सायकल व कार मध्ये भीषण अपघात…

चिखली ते मेहकर रोड वरील खैरव फाट्यावर आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कार ट्रक व मोटार सायकल मध्ये भीषण अपघात होऊन यामधील मोटार सायकल वरील पती-पत्नी व मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चिखली ते मेहकर रोडवरील खैरव फाट्यावर आज 3:30 वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि डस्टर कार क्र. एमएच ०४ जीइ ५५०८ आणि प्लॅटिना मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की मोटारसायकलचा अक्षरक्षः चुराडा होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता . या अपघातात मोटरसायकलवरील बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा येथील रहिवासी गणेश यादव गायकवाड (वय ४५) हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह ठार झाले. पत्नी लक्ष्मी गणेश गायकवाड (वय ४०), मुलगा कृष्णा गणेश गायकवाड (वय १५) अशी या दुर्देवी मृतांची नावे आहेत. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले गणेश गायकवाड हे गंभीर अवस्थेत होते, आणि त्यांना चिखली येथील डॉ. जवंजाळ हॉस्पिटलमध्ये नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच, चिखली पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठविले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या इतरांना तातडीने चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. वाहनाचा अतिवेग किंवा चुकीचा ओव्हरटेकमुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. किंवा, ट्रक आणि कारच्या चालकांच्या निष्काळजीमुळे तिघांचा हकनाक बळी गेल्याचा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटल्या आहेत. या अपघातात पती, पत्नी आणि मुलाच्या मृत्यू मुळे घाटनांद्रा गावावर शोककळा पसरली आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button