बाबासाहेब जाधवच्या सुनबाई श्रवंती ला सातासमुद्रापार आमेरिकेत राज्यपालाच्या हस्ते लन्सतज्ञ पदवी बाहाल

बाबासाहेब जाधवच्या सुनबाई श्रवंती ला सातासमुद्रापार आमेरिकेत राज्यपालाच्या हस्ते लन्सतज्ञ पदवी बाहाल
बुलडाणा,(प्रतिनिधी)- मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील जूने जानते डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने प्रेरित झालेले रिपब्लिकन पार्टीचे नेते त्यागमुर्ती स्मृतीशेष नागोराव जाधव गुरूजी यांच्या नात सुन आणि वडीलांच्या पायावर पाय ठेवीत आंबेडकरी विचारधारेने प्रेरित झालेले एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे कामगार नेते, बुलडाणा जिल्हा रिपाई आठवलेचे जिल्हासंपर्क प्रमुख तथा बुलडाणा मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे मुख्यसंघटक पत्रकार बाबासाहेब जाधव आणि बुलढाणा जिपच्या सेवानिवृत्त शिक्षिण विस्तार अधिकारी विमल बाबासाहेब जाधव यांच्या सुनबाई व डॅा. योगेश बाबासाहेब जाधव मेडिसिन आमेरिका यांच्या पत्नी डॅा.श्रवंती योगेश जाधव यांना सातासमुद्रापार अमेरिकेच्या होयावो राज्यात किल्वीलंड येथे राज्यपालाच्या हस्ते वैद्यकीय शास्रातील लन्सतज्ञ ही पदवी पदवीदान समारंभात ७ जून २०२५ रोजी प्रदान करण्यात आली.
डॅा.श्रवंती जाधव यांना या आगोदर दिनांक १८ मे २०१८ रोजी अमेरिकेतील प्रतिष्ठित वैद्यकीय मान्यवरांच्या हस्ते “ उत्कृष्ट डिन टिचींग अवार्ड-२०१८“ चा पुरस्कार मिळाला होता.
डॅा. योगेश यांनी प्राथमिक,माध्यमिक शिक्षण मराठी भाषेत बुलडाणा येथील भारत विद्यालय व एडीएड हायस्कूल येथे पूर्ण केले व डॅा. श्रवंती हीने हैद्राबाद येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले व नंतर यांनी पुणे येथे एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण उच्चत्तम गुण संपादन करून नंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेची युएसएमएलए ही परिक्षा देऊन त्यांनी बुध्दीमत्तेच्या जोरावर अमेरिकेच्या वैद्यकीय परिक्षेत उच्चत्तम गुण संपादन करून त्यांची पूढील उच्च वैद्यकीय शास्त्राच्या पदवीच्या शिक्षणसाठी सन २०१४ साली आमेरिकेतील पेनिसिलीन व्हिनीया स्टेटमध्ये हरिसबर्ग येथील पिनीकल हेल्थ हॅाऊसपीटलमध्ये एमडी मेडीसीन साठी निवड झाली व त्यांनी एमडी मेडिसिन ही पदवी संपादन केली व त्याच विद्यापीठात एमडी,एमएसच्या विद्यार्थ्यांना अधिव्याख्याता म्हणून शिक्षण दिल्यामुळे डॅा.श्रवंती जाधव यांना टेक्सल युनिव्हर्सिटी फिलाडेल्फिया अमेरिकेतर्फे दि.१८ मे २०१८ रोजी ‘उत्कृष्ट डीन टिचिंग अवार्ड-२०१८ ‘ प्रदान करण्यात आला.
त्यानंतर त्यांनी होयाओ राज्यातील किल्विलंड येथील हार्डचे जगप्रसिद्ध हाऊस्पिटल किल्विलंड क्लिनीक येथे वैद्यकीय सेवा केली व तेथेच लन्सचे शिक्षण २०२२ ते २०२५ पर्यंत घेतले व त्या लन्स या वैद्यकीय परिक्षेत उच्चत्तम गुण घेऊन त्या पास झाल्या व त्यांना राज्यपाल, चिपबोर्ड डायरेक्ट इतर मान्यवरांच्या हस्ते ७ जून २०२५ रोजी लन्सतज्ञ ही पदवी बहाल करण्यात आली.
आता त्यांना अमेरिकेन सरकारने फ्लोरिडा राज्यातील ओरलॅान्डो येथे लन्स तज्ञ म्हणून नेमनुक झाली आहे.
“उत्कृष्ट डिन टिचिंग आवार्ड” व लन्सतज्ञ आजपर्यंत एकाही बुलडाणा जिल्ह्याला देण्यात आलेला नसल्याचे दिसते सदर पुरस्कार व लन्सतज्ञ म्हणून पहिल्या मानकरी जिजाऊ, ताराबाई शिंदे, संत चोखोबा, संत गजानन महाराजांच्या बुलडाणा जिल्ह्याला पुरस्कार, लन्सतज्ञ पहीला मान आमेरिकेत मिळाला आहे. आपल्या आई वडिलांचे व जिल्ह्याचे नाव रोशन करणारी डॅा.श्रवंती व जोडीदार डॅा. योगेश आमेरिकेत वैद्यकीय सेवा देत आहे.
ते बुलडाणा जिल्हाला विसरले नाही ते आपल्या योगदानातून आपल्या आईवडीलांच्या माध्यमातून ते सामाजिक, धार्मीक कामसाठी मदत करीत आहेत.
लन्सतज्ञ पदवी मिल्याबद्दल बुलडाणा जिल्ह्यातील त्यांच्यावर प्रेम करणारे विविध राजकीय, सामाजिक,धार्मीक, पत्रकाराता क्षेत्रातील नामवंतांकडून व प्रतिष्ठित नागरिकांकडून, मित्र व कुटुंबांतील परिराकडून सर्व स्तरातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.