बातमी

कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढऊ… विजयराज शिंदे

बुलढाणा येथे संकल्प से सिद्धी तक कार्यक्रम संपन्न

बुलढाणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 11 वर्ष सुशासनाचे पूर्ण झाले आहेत त्या अनुषंगाने अकरा वर्षात केलेल्या कामांची माहिती जनसामान्य पर्यंत पोहोचावी यासाठी संकल्प से सिद्धी तक या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेला माहिती सांगण्यात यावी यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बुलढाणा शहरातील स्थानिक गर्दी वाचनालय येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यावेळी मंचावर प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा ,ज्येष्ठ नेते जगदेवराव बाहेकर ,ज्येष्ठ नेते एड व्हि.डी. पाटील, विश्वनाथ माळी , चंद्रकांत बर्दे जिल्हा संयोजक संकल्प सिद्धी तक, सौ स्मिता चेकेटकर , सौ सिंधुताई खेडेकर उपस्थित होते
यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात भाजपा बुलढाणा नगर परिषद स्वबळावर लढणार की युतीत या प्रश्नावर माजी आमदार विजय शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सूचक वक्तव्य केले…
यावेळी आमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देखील वाहिण्यात आली
या कार्यक्रमास माजी नगरसेविका, श्रीमती वैजयंतीताई कस्तुरे माजी नगरसेविका, विश्राम पवार राज्यसचिव कामगार आघाडी, एड. मोहन पवार माजी राजेश्वर उबरहंडे संयोजक बुलढाणा विधानसभा, उदय देशपांडे माजी नगरसेवक, दत्ता शिंदे जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी, भगवान गरुडे जिल्हाध्यक्ष शिक्षिका आघाडी, संजय अग्रवाल माजी नगरसेवक, सौ सुभद्रा इंगळे माजी नगरसेवक, सौ सरला बाहेकर माजी नगरसेवक, सौ अलका पाठक जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा, सौ वर्षा पाथरकर महिला मोर्चा, शहर उपाध्यक्ष प्रदीप सोनटक्के, प्रतीक गायकवाड युवा मोर्चा शहराध्यक्ष ,शहर सहसंयोजक सचिन टेंभीकर,प्रदीप बेगाणी,यतीन वैभव इंगळे ,स्फूर्तीदीप ठाकरे,वैभव राजपूत, अभिषेक वायकोस व इतर कार्यकर्ता व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button