बातमी

शिवसेना नेते केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत उबाठा महीला आघाडी पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश …

शिवसेना नेते केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये चिखली तालुक्यातील उबाठा गटाच्या महिला आघाडी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षात प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुक पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश शिवसेनेला संघटनात्मक मजबुती देणारे ठरणार आहेत …

 

शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात 15 जून रोजी हा पक्ष प्रवेश सोहळा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के महिला आघाडी तालुका प्रमुख कविताताई दांदडे शहर संघटक सौ किरण हिवाळे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी चिखली तालुक्यातील उबाठा गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या मध्ये

🔹 सौ. कल्पनाताई गोविंद बोधेकर – उपजिल्हा प्रमुख
🔹 सौ. लताताई कैलास शिंदे – उपशहर प्रमुख
🔹 सौ. द्वारकाताई संजय भोसले – भाजपाच्या माजी तालुकाप्रमुख
🔹 वैशाली संजय घोरपडे, रेखा मिलिंद लव्हाळे, उमा महेश बोधेकर, शीला एकनाथ खरात, मंदा मिलिंद डोंगरदिवे, स्वाती रामा खिल्लारे, ज्योती रवी जाधव
🔹 मनसेचे तुकाराम साप्ते, योगेश जाधव, गणेश आवचार, अनिकेत श्रीमंत यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गावागावात पोहचवण्याचा निर्धार व्यक्त केला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये झालेला हा पक्षप्रवेश शिवसेनेला जिल्ह्यात संघटनात्मक उभारी देणारा ठरणार आहे

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button