मोबाईलच्या*विळख्यात* *खो*खो*खेळाडूंची*अग्निपरीक्षा* *उपाध्यक्ष- टी ए.सोर सर – सातत्य महिनत जिद्द व परिश्रम करण्याचे खेळाडू समोर मोठ्या *आव्हान.*

*मोबाईलच्या*विळख्यात* *खो*खो*खेळाडूंची*अग्निपरीक्षा*
*उपाध्यक्ष- टी ए.सोर सर – सातत्य महिनत जिद्द व परिश्रम करण्याचे खेळाडू समोर मोठ्या *आव्हान.*
महाराष्ट्राच्या अस्सल मातीत खेळला जाणारा खो खो या खेळाला आज नव्या पिढीसमोर मोबाईल व वाढता डिजिटल माध्यमांचा वाढता वापर व प्रभाव तरुण पिढीला मैदानाशी जोडून ठेवणे ही एक खेळाच्या आणि खेळाडूंच्या भविष्यासाठीची मोठी कसोटी ठरत आहे. विदर्भ खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष टि ए सोर सर यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत खो खो खेळाची खेळाडू व क्रीडा मंडळे यांच्या समोरील आव्हानांचे भाष्य सविस्तर केले आहे
प्र- आजच्या तरुण पिढीला लागलेला मोबाईलचा छंद व त्यात नेहमी व्यस्त असलेले तरुण. खेळाचे भविष्य व क्रीडा मंडळा समोरील आव्हान कोणती
उत्तर- तरुण पिढीमध्ये आज खेळ व खेळा प्रती आकर्षण व उत्साह कायम आहे परंतु वाढता मोबाईलचा वापर, वाढता सोशल मीडियाचा वापर हे खेळाडू व खेळ व क्रीडा मंडळ समोरील एक मोठ्या आव्हान आहे. खो खो हा खेळ नियमित सातत्यपूर्ण सराव कौशल्य वेगवेगळी डावपेच जनक्शा बुद्धिमत्त याचा एक संगम आहे. हे करण्याची खेळाडूंची तयारी असावी. व हे करून घेण्याची क्रीडा मंडळाची देखील तयारी असावी ही सर्व मंडळी सर्व खेळाडू खेळाडूंचे पालक यांच्यासमोरील एक जबाबदारी आहे.
प्रश्न. खेळाडू व खेळाडूंचे पालक यांच्या मानसिक तेच झालेला बदल एक आव्हान वाटते का?
उत्तर- नक्कीच खेळाडू व पालक यांच्या मानसिकतेत झालेला बदल हे देखील एक मोठे आव्हान खेळासमोर उभे राहिले आहे. कारण पालक आज खेळाडूंना मैदानापर्यंत जाण्यास टाळाटाळ करतात खेळाडू देखील परिश्रम करण्यास तयार नाही. कमी परिश्रमात खेळाडूंना व पालकांना यश हवे आहे. ही देखील एक मोठी समस्या वाटत आहे आपल्या मुलांना खेळून काय मिळणार असे अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये उद्भवतात हे देखील एक मोठे आव्हान दिसून येते.
प्रश्न. या आव्हानांवर मात करण्यासाठी शासनाने काय परिश्रम घ्यावेत व काय उपाययोजना कराव्यात.
केवळ समस्या मांडून उपयोग होणार नाही त्याचे ध्येय धोरण व उपाययोजना करण्याची गरज आहे.
1) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासनाची स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र असावी त्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना मोफत प्रशिक्षण सोई सुविधा व नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यावे.
2) प्रतीक मंडळाच्या ठिकाणी सई सुविधा उपलब्ध करून देणे
उत्तर- अनेक वर्षापासून अनेक मंडळे नियमित खेळाडूंकडून सराव करून घेत आहेत उत्कृष्ट खेळाडू निर्माण करत आहेत. अशा क्रीडा मंडळांना देखील शासनाने सही सुद्धा उपलब्ध करून द्याव्या. जिल्ह्यांचे नाव रोशन करणाऱ्या खेळाडूंना व क्रीडा मंडळाला विशेष प्रोत्साहन पर बक्षीसे शासनाने जाहीर करावी. व प्रोत्साहन पर बक्षीस व मदत करावी.
असे अनेक समस्या खेळाडू व मंडळासमोर आहे खेळाडू नेहमीच आपला सराव करावा. आणि तसेच उत्कृष्ट खेळाडू तयार करत राहावे खेळाडूंनी सोशल मीडिया व मोबाईलच्या विळख्यातून बाहेर येऊन आपल्या करिअरकडे लक्ष आपण द्यावे. आपली मंडळे नेहमीच आपणास प्रोत्साहन व मदत करत असतात. अशा मंडळांना व जिल्हा संघटनांना शासन मदत करेल अशी आशा वाटते. मंडळांनी व खेळाडूंनी आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे व खेळाडूंकडे गांभीर्याने लक्ष द्यावे हीच कळकळीची विनंती.



