बातमी

पिंपळगाव देवी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा

कस काय?’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

*पिंपळगाव देवी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा*
*‘कस काय?’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन*

बुलढाणा, दि. 25 राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘कस काय?’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळगाव देवी, ता. मोताळा येथे दि. १३ व १४ ऑगस्ट रोजी समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव यांनी मार्गदर्शन केले. दोन दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेंद्रे, कविता खाडे, सुनीता जंवजाळ आणि सुलोचना पऱ्हाड यांनी सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा, समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन, आरोग्य जनजागृती तसेच ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे आणि आरोग्य व्यवस्थापनात समुदायाचा सहभाग बळकट करणे, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी डॉ. पिसे, डॉ. ऋषिकेश राठोड, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, आरोग्य सहाय्यक सुनील लोखंडे, बाजीराव पढार, गटप्रवर्तक तसेच आशा समन्वयक यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

गावोगावी आरोग्यदूतांची भूमिका बळकट : ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर विविध आरोग्य उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर जिल्हा आरोग्य विभागाचा भर आहे. समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) कार्यशाळेमुळे आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना समुदायाच्या गरजांनुसार आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले. प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम व संपन्न करण्यासाठी अशा प्रशिक्षण उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button