बातमी

डिजिटल परिवर्तनात राजर्षी शाहू मल्टीस्टेटची राष्ट्रीय स्तरावर मोहर

नवी दिल्लीत 'एक्सलन्स अवॉर्ड 2026' प्रदान; आधुनिक तंत्रज्ञान, ग्राहककेंद्री सेवेची दखल

इंडियन को-ऑपरेटीव्ह समीट अँड एक्सलन्स अवॉर्ड 2026 अंतर्गत राजर्षी शाहू मल्टीस्टेटला प्रतिष्ठेच्या ‘एक्सलन्स इन डिजिटल ट्रान्सफॉरमेशन अवॉर्ड 2026’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील द अशोक हॉटेल, चाणक्यपुरी येथे 19 नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. एफएसआयबीचे सदस्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश मराठे यांच्या हस्ते राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके,  संस्थेच्या अध्यक्षा मालती शेळके यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सहकार क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, ग्राहककेंद्री सेवा आणि नावीन्यपूर्ण कार्यपद्धतीच्या माध्यमातून अल्पावधीतच विश्वासार्ह ओळख निर्माण करणाऱ्या राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीने राष्ट्रीय स्तरावर यशाची मोहर उमटवली आहे. सहकार क्षेत्रात बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत ग्राहकांना जलद, सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू मल्टीस्टेटने आपल्या कार्यपद्धतीत आधुनिकतेचा प्रभावी समन्वय साधला आहे. ग्राहकांचा अतूट विश्वास, नावीन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक आर्थिक सेवा आणि व्यवस्थापनातील कार्यक्षमता यांच्या बळावर संस्थेने अल्पावधीतच आपला कार्यविस्तार साधत सहकार क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे. याच प्रगतीशील वाटचालीची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल म्हणजे हा पुरस्कार होय. या पुरस्कार सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली.
यावेळी एनएएफसीयूबीचे अध्यक्ष लक्ष्मी दास, इफकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी, एनयुसीएफडीसीचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, आरबीआय ॲडव्हायझरी ग्रुपच्या सदस्य गौतम ठाकूर, विद्याधर अनास्कर, विशाल सिंह, मोहन कुंडारिया, सुरेशआण्णा वाबळे, ॲड. शंकर गडगे यांच्यासह सहकार, बँकिंग आणि कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील मान्यवर उपस्थित होते.

       संस्थेला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सभासदाच्या विश्वासाचा आणि सहकार्याचा गौरव आहे. हा पुरस्कार मी राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या सर्व सभासदांना समर्पित करते.

 मालती शेळके

संस्थाध्यक्षा, राजर्षी शाहू मल्टीस्टेट, बुलढाणा

 संस्थेच्या वाटचालीला नवी प्रेरणा
राजर्षी शाहू मल्टीस्टेटला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार संस्थेच्या नेतृत्वाची दूरदृष्टी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सामूहिक प्रयत्न आणि सभासदांच्या विश्वासाची पावती ठरला आहे. बुलढाण्याच्या मातीतून सुरू झालेला संस्थेचा सहकार आणि विश्वासाचा प्रवास राष्ट्रीय स्तरावर पोहोचणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. ‘सहकारातून समृद्धी’ हे ध्येय अधिक व्यापक करण्यासाठी संस्थेच्या वाटचालीला या पुरस्कारामुळे नवी प्रेरणा मिळाली आहे.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button