हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुलढाण्यात निधीचा पाऊस आ. संजय गायकवाड यांच्या मागणीवर 51 कोटी रुपये मंजूर

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुलढाण्यात निधीचा पाऊस
आ. संजय गायकवाड यांच्या मागणीवर 51 कोटी रुपये मंजूर
बुलढाणा
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल 51 कोटी रुपये ची विकास कामे मंजूर करून घेतली आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत निधीचा पाऊस पडल्याने येणाऱ्या काळात विकास कामे अधिकच वेगात होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे
गुरुवारी नागपूर येथे आयोजित हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात जिल्हा न्यायाधीशाने पाच दिवाणी न्यायाधीश व मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्याकरिता पाच दहा निवासस्थाने उभारण्याची मागणी केली होती सदर निवासस्थानासाठी 7.86 कोटी रुपयाचा निधी मागणी केली होती सार्वजनिक बांधकाम उपविभाग बुलढाणा अंतर्गत सदर कामास मंजुरी मिळाली आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील राजुर गुळवेली रस्ता वरील पुलाच्या कामासाठी तीन कोटी 52 लाख रुपये ची मागणी करण्यात आली होती सदर मागणी देखील मंजूर करण्यात आली आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गतच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील वरवंड ते खेडी रस्त्याच्या विकासासाठी 58 लाख मतदारसंघातील वडगाव महाळुंगी रस्त्याची सुधारण्यासाठी 53 लाख बुलढाणा जिल्ह्यातील दहिद बु ते जरी रस्त्याच्या सुधारण्यासाठी 98 लाख गुंमी ते जुनून रस्त्याच्या सुधारण्यासाठी 96 लाख रुपये भादोला ते वरवंड रस्त्याची लांबी सुधारण्याकरिता 66 लाख रुपये कुरा गोतमारा रस्त्याच्या सुधारण्यासाठी 98 लाख रुपये जळगावकरिता कोंडेवाडी भागात रस्ता रुंदीकरणासाठी 65 लाख रुपये धामणगाव बढे येथे पानेरा रस्त्याच्या सुधारण्यासाठी एक कोटी 43 लाख रुपये धामणगाव बढे ते पंचलिंग देवस्थान रस्ता सुधारण्यासाठी एक कोटी 43 लाख रुपये रस्ता तसेच गावातील रस्त्याची लांबीची सुधारणा करणे करिता 79 लाख रुपये पाणी पुरवठा विहीर ते स्मशानभूमी धामणगाव बढे रस्त्याच्या सुधारणेसाठी 98 लाख रुपये मोताळा तालुक्यातीलच खरबडी ते शिरवा रस्त्याच्या सुधारणे करिता दोन कोटी तेरा लाख एकूण बारा कोटी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील शेंबा जयपुर कोथळी तरोडा वरवंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सात कोटी चाळीस लाख रुपये शेंबा जयपूर कोथळी तरोडा वरवंड रस्ता वरील फुलाच्या कामासाठी तीन कोटी रुपये मलकापूर पिंपळगाव देवी धामणगाव बढे रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करिता दोन कोटी रुपये भादोला वाडी ते रुईखेड टेकाळे ची सुधारणे करिता तीन कोटी दहा लाख रुपये पिंपळगाव देवी धामणगाव बढे रस्त्यावरील लहान पूलांच्या कामाकरिता दोन कोटी बावीस लाख रुपये माळवीर पोखरी खु रस्ता वरील लहान पुलाचे बांधकामाकरिता 90 लाख रुपये तरारखेड धामणगाव रस्त्यावरील लहान पूलांकरिता दोन कोटी रुपये मड गुणी करारखेड धामणगाव रस्त्यावरील पुलाकरिता दोन कोटी रुपये माळ विहीर पोखरी कोपगाव रस्त्यावरील पुलाकरिता दोन कोटी 24 लाख मतदारसंघातील हनवत खेड जि डोळा महाल पिंपरी रस्त्यावरील संरक्षण भिंत कामाकरिता 81 लाख रुपये माळेगाव निपाणा सावरगाव शेलगाव बाजार दाताळा उर्वरित लांबीच्या रस्त्याची सुधारणे करिता ८२ लाख रुपये सोलापूर तालखेड महालक्ष्मी रस्त्याच्या सुधारण्याकरिता 96 लाख रुपये बोराखेडी पोफळी पिंपळगाव देवी सुधारणे करिता दोन कोटी रुपये असे एकूण बुलढाणा विधानसभा मतदारसंघात डिसेंबर 2023 च्या पुरवणी अर्थसंकल्पात एकूण 51 कोटी 31 लाख रुपयांची कामे पहिलाच दिवशी मंजूर झाल्याने विकासाचा महामेरू असाच घोडदळ करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे



